Indian Economy : अमेरिका आणि जर्मनीत मंदीचे वारे, चीनच्या बाजारात हाहाकार, भारताचा तर रेकॉर्ड वर रेकॉर्ड

America Europe Recession : 2008 नंतर अमेरिका आणि जर्मनीत पुन्हा मंदीचे वारे वाहत आहेत. सराफा बाजार कोसळला आहे. तर अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले आहे. चीनमधील उद्योग सुद्धा अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. याउलट भारतीय अर्थव्यवस्थेने भरारी घेतली आहे.

Indian Economy : अमेरिका आणि जर्मनीत मंदीचे वारे, चीनच्या बाजारात हाहाकार, भारताचा तर रेकॉर्ड वर रेकॉर्ड
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 12:07 PM

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आणि युरोपातील मोठी अर्थव्यवस्था जर्मनी पुन्हा एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या आकड्यांनी सरकारची झोप उडवली आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले आहे. परिणामी जगातील अनेक शेअर बाजारात त्सुनामी आली. तर जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराला पहिल्या तिमाहीत ब्रेक लागला. सलग दोन तिमाहीत घसरण दिसली तर त्याला मंदी मानल्या जाते. जवळपास दोन दशकांपर्यंत जगाची अर्थव्यवस्थेला उभारी देणारी चीनची अर्थव्यवस्था पण अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेने या कालावधीत चार चांद लावले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्यात वाढली

भारतातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आणि वस्तूंची जून तिमाहीत निर्यात वाढली आहे. ॲप्पल आयफोनमधील निर्यातीमधील तेजीमुळे भारतातून इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी उसळली. ती आता 8.44 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अभियांत्रिकी वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनानंतर आता भारतातून सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि वस्तूंची निर्यात करत आहे. गेल्यावर्षीतील पहिल्या तिमाहीत भारतातून 6.94 अब्ज डॉलरच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली होती. या जूनमधील तिमाहीत 4.8 अब्ज डॉलरची मोबाईल निर्यात झाली, जी एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जवळपास 57 टक्के इतकी आहे. या दरम्यान ॲप्पलने देशातून 3.5 अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले.

हे सुद्धा वाचा

भारतासाठी आनंदवार्ता

जर्मनीची अर्थव्यवस्था सध्या सुस्तावलेली आहे. जर्मनी, अमेरिका आणि चीन नंतर जापानची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे. भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार असल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातच हा भीम पराक्रम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण सध्या जर्मनीचा वृद्धी दर जसा मंदावला आहे, त्यावरुन लवकरच भारत या स्थानावर पोहचण्याची शक्यता आहे. जवळपास दोन दशकांपर्यंत जगाची अर्थव्यवस्थेला उभारी देणारी चीनची अर्थव्यवस्था पण अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेने या कालावधीत चार चांद लावले आहेत.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.