वंदे भारत ट्रेनचा जागतिक प्रवास! परदेशातून मिळाली ऑर्डर

Vande Bharat Train | देशात सध्या 34 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या ट्रेनने भारतातील प्रवासाची दशा आणि दिशा बदलून टाकली. विमानापेक्षा या ट्रेनची भारतात क्रेझ आहे. अनेक विमान प्रवासी वंदे भारतकडे वळाले आहेत. वंदे भारतच्या या यशाने परदेशाचे पण डोळे दिपले आहेत. या ट्रेनसाठी ऑर्डर आल्या आहेत.

वंदे भारत ट्रेनचा जागतिक प्रवास! परदेशातून मिळाली ऑर्डर
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 2:19 PM

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : ‘Make in India’ चा जगभर डंका वाजत आहे. तेजस फायटरनंतर वंदे भारत ट्रेन खरेदी करण्यासाठी जगभरातील काही देशांनी विचारणा केली आहे. सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. स्लीपर वंदे भारतचे काम पण अंतिम टप्प्यात आले आहे. कदाचित या महिन्यातच याविषयीची मोठी अपडेट समोर येईल. देशातच नाही तर परदेशातून पण वंदे भारतचा डंका वाजला आहे. ही ट्रेन खरेदीसाठी विचारणा होत आहे. काही देशांनी यासंबंधीची मागणी केली आहे. चिलीने वंदे भारत खरेदीत रस दाखवला आहे. देशात पण अनेक राज्यांनी या ट्रेनची संख्या वाढविण्यावर आणि अंतरराज्यीय वंदेभारत सुरु करण्याची मागणी केली आहे.

आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत चर्चा

बिझनेसलाईनने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार दक्षिण अमेरिकेतील देश चिलीने वंदे भारतच्या डिझाईनमध्ये रुची दाखवली आहे. अर्थात चिलीशी प्राथमिक अवस्थेत चर्चा सुरु आहे. लवकरच या देशातून ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. केवळ चिलीची नाही तर परदेशातील अनेक देश या स्वदेशी स्वॅगवर फिदा आहेत. हे डिझाईन त्यांना आवडले आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिकावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक देशांनी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची मागणी नोंदवली आहे. सध्या वंदे भारत ब्रॉड गेजवर धावत आहे. पण स्टँडर्ड गेजसाठी यामध्ये बदल करण्यात येणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये स्टँडर्ड गेजचा वापर होतो.

हे सुद्धा वाचा

रेल्वेकडून निर्यात

रेल्वेची निर्यात कंपनी राईट्सकडे सध्या 2,100 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. श्रीलंकेने 1,400 कोटी रुपयांच्या रोलिंग स्टॉकची ऑर्डर दिली. तर आफ्रिकीतील देश मोझाम्बिकने 700 कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे. श्रीलंकेने 8 सेट डीएमयू, 10 ब्रॉड गेज लोकोमोटिव्ह आणि 160 कोचची ऑर्डर पुरवण्यात येणार आहे. राईट्सने बांगलादेश रेल्वेसाठी कोच पुरविण्याचे कंत्राट मिळवले आहे. ही 1000 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. भारतीय रेल्वे काही वर्षात फोर्ज्ड व्हील निर्यात करण्याची तयारी करत आहे. एकूणच भारतीय रेल्वेसाठी सुगीचे दिवस आले आहेत. वंदे भारतसाठी मोठी ऑर्डर आली तर रेल्वेला कोट्यवधींचा फायदा होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.