Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupee All Time Low | रुपयाचा डॉलरला साष्टांग दंडवत, पहिल्यांदा प्रति डॉलर 80 हून निच्चांकी

Rupee All Time Low News | मंगळवारी शेअर बाजारासोबतच रुपयाने पण आपटी खाल्ली. रुपयाने बाजारात सर्वकालीन निच्चांकी स्तर गाठला. प्रति डॉलर रुपयाचा भाव 80 रुपये झाला.

Rupee All Time Low | रुपयाचा डॉलरला साष्टांग दंडवत, पहिल्यांदा प्रति डॉलर 80 हून निच्चांकी
रुपयाचं सपशेल लोटांगणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:23 PM

Rupees Against Doller News : भारतीय चलन रुपया सध्या सर्वात वाईट स्थितीत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपयाचे मूल्य कमालीचे घसरले आहे. रुपया सातत्याने एका पाठोपाठ एक निच्चांकी स्तर गाठत आज रुपया सर्वकालीन निच्चांकी स्तरावर पोहचला. सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या (Parliamentary monsoon Session) पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला रुपयाच्या अवमूल्यनाविरोधात धारेवर धरले होते. पण सरकारकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी याविषयावर कोणतेही भाष्य केले नाही. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाला सावरण्यासाठी प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना कुठलेही यश आले नाही. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अंगिकाकरलेल्या कडक धोरणांमुळे रुपया मजबूत होत आहे आणि गुंतवणूकदार ही डॉलर इंडेक्सकडे (Dollar Index) वळला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. सोन्याच्या दरात ही कपात झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत भारतीय रुपया (Indian Rupees) सातत्याने पिछाडीवर चालला आहे. सोमवारीच फक्त त्यात अवघ्या 9 पैशांची तेजी दिसून आली होती. याचा परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होईल. इंधनाचा(Fuel Price) भडका उडेल. खाद्यतेल(Edible Oil) वाढेल. सोन्याच्या (Gold) किंमती भडकतील. म्हणजे जेवढ्या काही वस्तू आपण आयात करतो त्याच्या किंमती भडकतील आणि पर्यायाने महागाई वाढेल. त्यामुळे रुपयाची ही घसरगुंडी थांबली नाही तर महागाई आपल्या मुळावर येऊन बसेल एवढं मात्र नक्की.

या वर्षात काय होती स्थिती

रुपयावर अमेरिकन डॉलरचा (Dollar)दबाव गेल्या मंगळवारी ही कायम होता. गेल्या मंगळवारी 12 जुलै 2022 रोजी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.58 निच्चांकी स्तरावर घसरला, तर त्याचा अगोदर 5 जुलै 2022 रोजी रुपया 79.38 इतका घसरला होता. या वर्षात रुपया 7 टक्क्यांनी कमकूवत झाला आहे. अजून ही रुपया घसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

8 वर्षात 25 टक्के घसर

रुपयाचे अवमूल्यन आजेच नाही, तर वर्षी रुपयाचे अवमूल्यन सुरु आहे. गेल्या 8 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास रुपयाची किंमत सातत्याने घसरत असल्याचे दिसून येते. जवळपास दोन दशकांच्या कालावधीनंतर युरो आणि डॉलर समपातळीवर आले आहेत. एवढं नवीन चलन असून युरोपीय देशांच्या अक्कलहुशारीने आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे त्यांनी हा पल्ला अवघ्या 20 वर्षात गाठला. भारतीय रुपयाची गोष्ट पाहता, रुपया डिसेंबर 2014 पासून डॉलरच्या तुलनेत 25 टक्के कमकूवत झाला आहे. रुपया एक वर्षापूर्वी डॉलरच्या तुलनेत 74.54 स्तरावर होता.

कर्ज परतफेडीचा दबाव

भारताच्या व्यापारात तूट आली आहे.भारताने जूनमध्ये 25.6 अब्ज डॉलरची विक्रमी व्यापार तूट नोंदवली आहे. कोरोनानंतर आता कुठं भारतीय अर्थव्यवस्था सावरायला लागली आहे. त्यातच या वर्षी आणि पुढील वर्षभरात विक्रमी बाह्य कर्ज परतफेड करायची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशावर असलेले जागतिक 40% पेक्षा जास्त कर्ज ( $621 अब्ज) पुढील नऊ महिन्यांत परतफेड करायचं आहे. ही परतफेड भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या 44% च्या समतुल्य आहे. ही परतफेड करताना भारतीय रुपयावर दबाव येईल आणि रुपया पुन्हा कमकूवत होईल.

कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.