शेअर बाजाराने घडवला चमत्कार; Sensex पहिल्यांदाच 84,000 पार, निफ्टीची तुफान घौडदौड

Stock Market Boom : भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एक चमत्कार घडवला. बाजाराने सर्वकालीन उसळी घेतली आहे. बाजारातील दोन्ही पण निर्देशांकांनी जोरदार घौडदौड केली आहे. निफ्टीने नवीन विक्रम रचला तर सेन्सेक्स पहिल्यांदाच 84,000 अंकांच्या पार गेला आहे.

शेअर बाजाराने घडवला चमत्कार; Sensex पहिल्यांदाच 84,000 पार, निफ्टीची तुफान घौडदौड
शेअर बाजार तुफान तेजीत
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 11:38 AM

भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची तुफान घौडदौड सुरू आहे. तर मध्यंतरी गुंतवणूकदारांना आचके-गचके पण बसले. पण अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर बाजारावर परिणाम दिसणार हे निश्चित होते. इतर काही घडामोडींचा सकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स पहिल्यांदाच 84,159.9 आणि निफ्टी 25,692.70 या उच्चांकावर पोहचला. या घडामोडींमुळे गुंतवणूकदार आनंदून गेला आहे.

नवीन रेकॉर्ड नावावर

या वर्षभरात शेअर बाजाराने एका मागोमाग एक रेकॉर्ड नावावर केला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने यापूर्वी 83805.26 हा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीने 25,610.10 अंकाचा पल्ला गाठला आहे. आज सेन्सेक्स 561 अंकांच्या उसळीसह 83,746 अंकावर पोहचला तर निफ्टी 164 अंकांच्या दमदार कामगिरीसह 25,579 अंकावर व्यापार करत आहे. निफ्टी टॉप गेनरमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

विक्रमानंतर बाजाराने घेतली थोडी विश्रांती

रेकॉर्डतोड फलंदाजीनंतर शेअर बाजाराची चाल थोडी मंदावली. सेन्सेक्स 110 अंकांच्या उसळीसह 83,295 अंकावर व्यापार करत आहे. जेएसडब्ल्यू स्टील 3 टक्क्यांनी वधरुन 975.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील 1.40 टक्के वाढून 151.70 रुपयांवर व्यापार करत आहे. तर टायटन, एनटीपीसी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टिसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरला या लाटेत टिकता आले नाही.

जागतिक बाजारात तेजीचे सत्र

भारतच नाही तर जगातील अनेक बाजारात तेजीचे सत्र सुरू आहे. अमेरिकेपासून ते जपानपर्यंतच्या शेअर बाजारात सध्या तुफान आले आहे. गुरुवारी सुद्धा शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. तर अमेरिकन बाजारात पण तेजी दिसली. सेन्सेक्स-निफ्टीनंतर वॉल स्ट्रीटमध्ये डॉऊ जोन्स, एसअँडपी 500 उच्चांकी स्तरावर दिसून आले. या दमदार कामगिरीमुळे आशियातील बाजारात उत्साह दिसून आला. भारत,  सिंगापूर, दक्षिण कोरियासह सर्वच बाजार तेजीच्या हिंदोळ्यावर दिसले. गुंतवणूकदारांनी सणासुदीत कमाईचा उत्सव साजरा केला.

जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.