भारतीय शेअर बाजाराची गरूड भरारी; 1 लाखांचा टप्पा गाठण्यासाठी कितीसा लागणार अवधी? सेन्सेक्सच्या घौडदौडीने गुंतवणूकदारांचा आनंद मावेना गगनात

Indian Share Market : भारतीय शेअर बाजार गेल्या दहा वर्षांत झपाट्याने आगेकूच करत आहे. आता सेन्सेक्स 1,00,000 टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. त्यासाठी त्याला 17.5% उसळी घ्यावी लागणार आहे. हा आकडा आता कधी गाठणार याची चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय शेअर बाजाराची गरूड भरारी; 1 लाखांचा टप्पा गाठण्यासाठी कितीसा लागणार अवधी? सेन्सेक्सच्या घौडदौडीने गुंतवणूकदारांचा आनंद मावेना गगनात
शेअर बाजारात येणार का तुफान?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 4:55 PM

भारतातील सर्वात जुन्या निर्देशाकांने, Sensex ने गेल्या 45 वर्षांत गुंतवणूकदारांना 850 पट जोरदार रिटर्न दिला आहे. एप्रिल 1979 मध्ये सेन्सेक्समध्ये ज्यांनी 1 लाखांची गुंतवणूक केली, अर्थात त्यावेळी ही रक्कम फार मोठी, ती आता 8.5 कोटी रुपये इतकी झाली आहे. या आठवड्यात सेन्सेक्सने 85,000 अंकाचा टप्पा गाठला आहे. एक लाख अंकाचा मैलाचा दगड रोवण्यासाठी स्टॉक मार्केटने तयारी पूर्ण केली आहे. दलाल स्ट्रीटवरील अनेक तज्ज्ञ हा येत्या वर्षात, 2025 मध्ये हा आकडा गाठण्याचा दावा करत आहेत. जर सेन्सेक्सने त्याची जोरदार घौडदौड सुरू ठेवली तर सरासरी 16% CAGR ने वाढ नोंदवली तर डिसेंबर 2025 पर्यंत एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

कसं पूर्ण होईल 1 लाखांचं लक्ष्य?

सेन्सेक्सचा जादुई 1 लाखांचा आकडा गाठण्यासाठी बाजाराला 17.5% ची उसळी घ्यायची आहे. रोज जर बाजाराने एक टक्क्यांची उडी घेतली तर हा आकडा बाजार 18 ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्ण करेल. पण सध्या लागलीच हा चमत्कार होण्याची शक्यता धूसर आहे. डेझर्व्हचे सहसंस्थापक वैभव पोरवाल यांच्या मते, बाजाराला प्रति वर्ष 12-15% रिटर्न द्यावा लागेल. त्यामुळे 1,00,000 हा टप्पा गाठण्यासाठी बाजाराला 18-24 महिने लागतील. सध्याच्या घडामोडींमुळे बाजारात खरेदीदाराला उधाण आले आहे. त्यामुळे लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी दाखवला.

हे सुद्धा वाचा

बाजारासाठी ही कवायत महत्त्वाची

बाजाराला दमदार कामगिरी करण्यासाठी रिटेल फ्लोची अत्यंत गरज आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक आणि ब्लूचिप स्टॉक्सचा जोरदार कामगिरी गरजेची आहे. आर्थिक आघाडीवर भारताची जोरदार घौडदौड सुरू आहे. भारतात FII गुंतवणूकदार अधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एम के ग्लोबलचे शेषाद्री सेन यांच्या मते, परदेशी गुंतवणूकदार मध्यंतरी गोंधळले होते. पण आता त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला आहे. या वर्षात परदेशी पाहुण्यांनी आतापर्यंत जवळपास 92,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर वर्ष 2023 मध्ये 1.7 लाख कोटींची गुंतवणूक होती. तज्ज्ञांच्या मते, जर सेन्सेक्सने त्याची जोरदार घौडदौड सुरू ठेवली तर सरासरी 16% CAGR ने वाढ नोंदवली तर डिसेंबर 2025 पर्यंत एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.