अमेरिकेच्या सरकारी खजिन्यापेक्षाही भारतीयांच्या घरात आहे जादा सोनं, पाहा सोन्याला किती आहे मागणी ?

सोन्याच्या दागिन्यांचा सोस भारतीयांना सर्वाधिक आहे. भारताप्रमाणे चीनमध्येही सोन्याचा वापर केला जात असतो. जगातील सर्वाधिक सोने भारतीयांच्या घरात असल्याचे म्हटले जाते.

अमेरिकेच्या सरकारी खजिन्यापेक्षाही भारतीयांच्या घरात आहे जादा सोनं, पाहा सोन्याला किती आहे मागणी  ?
GoldImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 9:11 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : सोन्याचं वेड भारतीयांना किती आहे याचे अनेक दाखले देता येतील. भारतातील स्रियाच काय पुरुषही  सोन्याचे दागिने घालत असतात. अनेक जण सोन्यात गुंतवणूक करीत असतात. काही अडीअडचण आली तर सोनं तारण ठेवून पैसे उचलतात आणि आपल्यावरील संकट दूर करतात. अशा प्रकारे सोन्याला पूर्वापार भारतात प्रचंड मोठी मागणी आहे. भारतात दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी होते. परंतू त्या तुलनेत भारतात सोन्याचं उत्पादन नगण्यच होतं असं म्हणाव लागेल.

आता सोन्याचा दर 59 हजार रुपयांपर्यंत गेला असला तरी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 76 वर्षांपूर्वी सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी केवळ 89 रुपये होता. म्हणजे सोन्याच्या किंमतीत तब्बल 661 पट वाढली आहे. तर चांदी 107 रुपये किलोग्रॅम होती आता 70 हजाराच्या पुढे गेली आहे. चीननंतर भारतातच सर्वाधिक सोन्याला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी असली तरी केवळ 1 टन सोन्याचे उत्पादन होते.

खाणीतून सोने काढून शुद्ध केले जाते

सोने हा धातू सर्वसाधारणपणे स्वतंत्र किंवा पारा किंवा चांदी या मिश्र धातूसोबत सापडतो. कॅलेवराईट, सिल्वेनाईट, पेटजाईट आणि क्रेनराईट लोखंडाच्या स्वरुपात सापडले जाते. सर्वाधिक सोने लोखंडासोबत जमिनीच्या खड्ड्यात सापडते किंवा भूमिगत खाणीत सापडते. जमिनीत वरच्या बाजूचे सोने डायनामाईट वापरुन काढले जाते. किंवा खोल खाणीतून खडकाचे तुकडे सुरुंगाद्वारे तोडून शुद्ध करण्यासाठी सोन्याच्या मिलमध्ये पाठवले जाते.

पृथ्वीच्या पोटातून 2 लाख टन सोनं निघालं

युएस जिओलॉजिकल सर्वेनूसार आतापर्यंत जगभरातील खाणीतून 2 लाख टन सोनं काढण्यात आलं आहे. अजूनही 50 हजार टन सोनं शिल्लक आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानूसार भारतात जमिनीतून 1 एप्रिल 2020 च्या आकडेवारीनूसार 5.86 टन सोन शिल्लक राहीलं आहे.

भारतातील घरात अमेरिकेपेक्षा जादा सोने

अमेरिकेला जागतिक महाशक्ती म्हटले जाते. परंतू वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका अहवालानूसार भारतीय घरात 2019 मध्ये 25,000 टनाहून जास्त सोने होते. डीपार्टमेंट ऑफ द ट्रेजरी ब्युरो ऑफ द फिस्कल सर्व्हीसच्या साल 2021 च्या डाटानूसार अमेरिकेच्या सरकारी तिजोरीत 8 हजार टनाहून अधिक सोने आहे. म्हणजेच अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा तीन पट जास्त सोने भारतीयांच्या घरात आहे. भारतीयांच्या विविध देवस्थानांकडे चार हजार टनाहून अधिक सोने आहे.

देशात येथे सोन्याच्या खाणी

भारतात कर्नाटकतील कोलार, हट्टी, झारखंडमध्ये परासी गोल्ड माईंस, कुंदर कोचा माइंस, पहाडीया गोल्ड माइंस, चांडील येथे सोन्याच्या खाणी आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.