नवी दिल्ली | 17 February 2024 : शिव नाडर, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, रतन टाटा हे दानशूरांमधील मोठे नाव आहे. दानशूरांच्या यादीत हुरुन इंडियामध्ये एका दाम्पत्याने पण नाव कोरले आहे. सुष्मिता आणि सुब्रतो बागची असे त्यांचे नाव आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलेंथ्रॉपिस्ट यादी 2023 अनुसार, सुष्मिता और सुब्रतो बागची हे दाम्पत्य भारतातील दानशुरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 1100000000 रुपयांहून अधिक रक्कम दान केली होती. तर सुष्मिता बागची यांनी एकट्याने गेल्य वर्षी 2130000000 रुपये दान केले होते. इतके मोठे दान केले असताना पण त्या प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात.
ओडिशामध्ये झाला जन्म
सुष्मिता बागची यांचा जन्म कटकमध्ये झाला. त्या प्रसिद्ध ओडिशा लेखिका शकुंतला पांडा यांची कन्या आहेत. त्यांनी आईच्याच पावलांवर पाऊल टाकलं आहे. सुष्मिता बागची पण एक प्रसिद्ध उडिया लेखिका झाल्या. त्यांचे महिलांसाठीचे मासिक सुचरिता हे लोकप्रिय आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठात त्या व्याख्याता, लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. त्या अवघ्या 15 वर्षांच्या असताना त्यांची पती सुब्रतो बागची यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चार वर्षांनी दोघांनी लग्न केले.
आईकडून मिळली प्रेरणा