Ratan Tata : आता इंग्लंडमध्ये टाटा ब्रँडचा बिगुल! साहेबांच्या देशात बोलबाला

Ratan Tata : भारतीय जागतिक ब्रँड टाटा समूह आता इंग्लंडमध्ये फॅक्टरी टाकणार आहे. समूहाच्या अनेक कंपन्या साहेबांच्या देशात काम करत आहे. पण यावेळी मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. जागतिक बाजारात भारतीय नाणं खणाणार आहे.

Ratan Tata : आता इंग्लंडमध्ये टाटा ब्रँडचा बिगुल! साहेबांच्या देशात बोलबाला
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : भारत सरकार सध्या मेक इन इंडियावर जोर देत आहे. आता जगभरातील ब्रँड देशात दाखल होत आहेत. चीनला बायबाय करत अनेक जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक सुरु केली आहे. तर भारतातील मोठ्या ब्रँड्सला आता विस्ताराचे वेध लागेल आहेत. टाटा समूहाची (Tata Group) भारतात मांड आहेच. पण जागतिक बाजारात ही चांगले नाव आहे. टाटा समूह आता ब्रिटेनमध्ये लक्षवेधी गुंतवणूक करणार आहे. भारतीय जागतिक ब्रँड टाटा समूह आता इंग्लंडमध्ये फॅक्टरी टाकणार आहे. समूहाच्या अनेक कंपन्या साहेबांच्या देशात काम करत आहे. पण यावेळी मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. जागतिक बाजारात भारतीय नाणं खणाणार आहे.

मोठी गुंतवणूक

टाटा समूह ब्रिटेनमध्ये 230 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. बुधवारी कंपनीने साहेबांच्या देशात गीगा फॅक्टरी (Battery cell Gigafactory) सुरु करण्याची घोषणा केली. आतापर्यंत ऑटो सेक्टरमधील मोठ्या गुंतवणुकीपैकी ही एक गुंतवणूक असल्याचा दावा पंतप्रधान ऋषि सुनक यांनी केला.

हे सुद्धा वाचा

भारतात ही गुंतवणूक

टाटा समूह हा भारताची ओळख आहे. कंपनी भारतात पण बॅटरी उत्पादनासाठी गुंतवणूक करत आहे. टाटा समूह भारतात 1.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करुन बॅटरी प्लँट सुरु करण्याच्या तयारीत आहे.

वार्षिक 40 गीगावॅट सेलचे उत्पादन टाटा सन्स (Tata Sons) इंग्लंडमध्ये गीगाफॅक्टरी (Battery cell Gigafactory) स्थापन करणार आहे. यामुळे ग्रीन टेक इकोसिस्टिम वाढीला लागेल. त्यासाठी 425 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. टाटाच्या या फॅक्टरीतून वर्षाला 40 गीगावॅट सेलचे उत्पादन होईल. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि अक्षय ऊर्जेसाठी हे मोठं पाऊल आहे.

टाटा समूहाच्या अनेक कंपन्या युकेमध्ये

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्यानुसार, समूहाच्या अनेक कंपन्या सध्या इंग्लंडमध्ये काम करत आहेत. टाटाच्या या प्लँटमुळे इंग्लंडमध्ये या क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रणा सुरु होईल. सध्या इंग्लंडमध्ये टेक्नॉलॉजी, कंझ्युमर, हॉस्पिटॅलिटी, स्टील, केमिकल्स आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये टाटा समूह काम करत आहे.

मोठ्या प्रमाणात रोजगार

क्लीन इंडस्ट्रीजच्या माध्यमातून भारतीय कंपनी परदेशात मजबूत स्थान निर्माण करत आहे. टाटा समूहाच्या या प्रयत्नामुळे ग्रीन एनर्जी सेक्टर मजबूत होईल. टाटा समूहावर परदेशात विश्वास बळावल्याचे हे द्योतक आहे. ब्रिटनमध्ये कुशल मनुष्यबळ तयार होईल. हजारो तरुणांना रोजगार मिळेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.