Tata Group : काळाच्या उदरात गडप होणार होता विश्वसनीय ब्रँड! या मालकीणीने विकला कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आणि मौल्यवान सामान

Tata Group : भारताचा विश्वसनीय ब्रँड म्हणून टाटाचा नावलौकिक जगभरात आहे. टाटा कंपनी त्यांच्या मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण एकेकाळी ही कंपनी बुडण्याच्या स्थितीत होती. त्यावेळी या ब्रँडच्या मालकीणीने मोठा त्याग केल्यानंतर या ब्रँडने उंच भरारी घेतली...

Tata Group : काळाच्या उदरात गडप होणार होता विश्वसनीय ब्रँड! या मालकीणीने विकला कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आणि मौल्यवान सामान
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली : भारतातील मोठे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे भारतीय उद्योग जगताची ओळख आहे. भारताचा विश्वसनीय ब्रँड म्हणून टाटाचा नावलौकिक जगभरात आहे. टाटा कंपनी त्यांच्या मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. टाटाचा कारभार जगभरात पसरला आहे. या समूहाच्या (Tata Group) अनेक कंपन्या नावारुपास आल्या आहेत. देशावर ज्यावेळी संकट आले, त्यावेळी टाटा समूह कायम धावून आला. पण एकेकाळी ही कंपनी बुडण्याच्या स्थितीत होती. त्यावेळी या ब्रँडच्या मालकीणीने मोठा त्याग केल्यानंतर या ब्रँडने उंच भरारी घेतली. लेडी मेहरबाई टाटा (Lady Meherbai Tata) यांनी पडत्या काळात टाटाला मोठा आर्थिक हातभार लावला. मेहरबाई टाटा सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी होत्या.

प्रसिद्ध लेखक हरीश भट्ट यांनी TataStories: 40 Timeless Tales To Inspire You या पुस्तकात याविषयीचा किस्सा सांगितला आहे. त्यात लेडी मेहरबाई यांनी टाटा समूह कसा वेळीच वाचवला याची माहिती दिली आहे. जमशेदजी टाटा यांचा मोठा मुलगा सर दोराबजी टाटा यांच्याशी मेहरबाई टाटा यांचे लग्न झाले होते. त्यांनी वेळीच निर्णय घेतला. त्यांच्याकडील किंमती ऐवज विकून आजची विख्यात टाटा स्टील कंपनी वाचवली.

जमशेदजी टाटा यांचे मोठे सुपूत्र दोराबजी टाटा यांनी पत्नी लेडी मेहरबाई यांच्यासाठी लंडन येथील व्यापाऱ्याकडून 245.35 कॅरेट जुबली हिरा खरेदी केला होता. कोहिनूर हा 105.6 कॅरेटचा आहे. त्यापेक्षा जुबली हिरा दुप्पट कॅरेटचा होता. 1900 शतकात या हिऱ्याची किंमत 1,00,000 पाऊंड होती. हा अमूल्य हिरा मोठ्या कार्यमक्रमाच्यावेळी त्याच्या गळ्याची शोभा वाढवत असे. पण 1924 मध्ये वासे फिरले आणि त्यांना पतीने दिलेली ही अमूल्य भेट विकावी लागली.

हे सुद्धा वाचा

एकवेळ अशी आली की, टाटा स्टीलवर मोठे आर्थिक संकट ओढावले. कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतका ही पैसा कंपनीकडे उरला नाही. त्यावेळी लेडी मेहरबाई यांनी कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुबली डायमंड, खासगी संपत्ती आणि बेशकिंमती वस्तू विक्रीचा निर्णय घेतला. त्यातून त्यांनी टाटा स्टीलसाठी मोठा निधी जमविला. या पैशांच्या भरवशावर कंपनीने पुन्हा उभारी घेतली. हिऱ्याच्या विक्रीतून आलेली रक्कम सर टोराबजी टाटा ट्रस्टच्या उभारणीसाठी ही वापरण्यात आली.

एवढे आर्थिक संकट आलेले असातनाही टाटा समूहाने टाटा स्टीलमधून एकही कर्मचारी काढला नाही. त्यांच्यावर कपातीचे संकट ओढावले नाही. कर्मचाऱ्यांनीही टाटांवर विश्वास ठेवला. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारताच कंपनीने सर्व थकबाकी चुकती केली. कर्मचाऱ्यांना पगार दिला.

लेडी मेहरबाई टाटा यांचे सामाजिक योगदानही मोठे आहे. 1929 मध्ये शारदा अधिनियम हा बाल विवाह प्रतिबंधक कायदा मंजूर करण्यात ही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी राष्ट्रीय महिला परिषद आणि भारतीय महिला परिषदेत सहभाग घेतला. 29 नोव्हेंबर 1927 रोजी त्यांनी मिशिगन राज्यात हिंदू विवाह विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांना महिलांना समान राजकीय हक्कासाठी प्रयत्न केला. त्यांच्या सहकार्यानेच भारताला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी होता आले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.