Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

999 रुपयांत विमान प्रवास, ‘इंडिगो’कडून प्रवाशांना बंपर ऑफर

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने तीन दिवसांसाठी आकर्षक ऑफर ग्राहकांसाठी दिली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही 999 रुपयात 53 डोमेस्टिक आणि 3499 रुपयात आंतरराष्ट्रीय प्रवास करु शकता. या ऑफरसाठी तुम्हाला 16 मे पर्यंत तिकीट बुक करावे लागणार आहे. सर्वात कमी किंमतीत विमान प्रवासाची सूट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक तिकीट बुक करतील असा […]

999 रुपयांत विमान प्रवास, 'इंडिगो'कडून प्रवाशांना बंपर ऑफर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने तीन दिवसांसाठी आकर्षक ऑफर ग्राहकांसाठी दिली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही 999 रुपयात 53 डोमेस्टिक आणि 3499 रुपयात आंतरराष्ट्रीय प्रवास करु शकता. या ऑफरसाठी तुम्हाला 16 मे पर्यंत तिकीट बुक करावे लागणार आहे. सर्वात कमी किंमतीत विमान प्रवासाची सूट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक तिकीट बुक करतील असा अंदाज कंपनीकडून वर्तवण्यात येत आहे.

10 लाख जागा उपलब्ध

विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरमध्ये एकूण 10 लाख जागा उपलब्ध आहेत. तसेच 16 मे पर्यंत बुकिंग केल्यास 29 मे ते 28 सप्टेंबरपर्यंत तुम्ही प्रवास करु शकता. प्रवास करण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

तिकीट बुंकिंगवरही ऑफर

जर तुम्ही मोबीक्विक मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून तिकीट बुक केले, तर तुम्हाला 1000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळू शकते. तसेच डिजीबँक डेबिट कार्डच्या माध्यमातून 4000 हजार किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार केला, तर तुम्हाला तिकिटावर 10 टक्के म्हणजेच 750 रुपयांची सूट मिळू शकते.

स्पाईसजेटकडूनही आकर्षक स्कीम

स्पाईसजेटनेही प्रवाशांसाठी आकर्षक स्कीम आणली आहे. स्पाईसजेटच्या फ्लाईटमध्ये प्रवास केल्यावर तुम्हाला स्टाईल कॅश दिली जाणार आहे. स्टाईल कॅश बुकिंग किंमतीच्या बरोबर असू शकते. कंपनीकडून ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत दिली जात आहे. स्टाईल कॅशचा वापर कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी केला जाऊ शकतो. ऑफरनुसार स्पाईसजेटकडून देण्यात येणारी कॅश कंपनीच्या वेबसाईटवर स्पाईस स्टाईल डॉट कॉममध्ये टाकण्यात येणार आहे. या पैशाने तुम्ही वेबसाईटवर शॉपिंग करु शकता. कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही कुटुंबासाठी कपडे, डिझाईनर चष्मे, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर खरेदी करु शकता.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.