Aircraft : एअर इंडियानंतर आता या कंपनीच्या ताफ्यात लवकरच 500 विमान!
Aircraft : आता या विमान कंपनीनेही विस्तार योजना आखली आहे. या कंपनीच्या ताफ्यात लवकरच 500 नवीन विमान दाखल होणार आहेत. तुर्कीच्या एअरलाईन्स कंपनीसोबत या कंपनीने करार केला आहे.
नवी दिल्ली : इंडिगोने (Indigo) युरोपमध्ये सेवांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, इंडिगो तुर्कीच्या एअरलाईन्ससोबत (Turkish Airlines) भागीदारीचा करार केला आहे. या विस्तार योजनेतंर्गत ही विमान कंपनी जवळपास 500 नवीन विमान (New Aircraft) ताफ्यात सहभागी करुन घेणार आहे. या कंपनीने विमानाची ऑर्डर यापूर्वीच दिली आहे. विमान या ताफ्यात येत राहतील. या नवीन करारामुळे भारतासह इस्तंबुलच्या प्रवाशांना जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचण्यास आणि सोयी-सुविधा मिळण्यास मोठा फायदा होईल. तुर्कीच्या एअरलाईन्ससोबत कराराचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे इंडिगोच्या प्रवाशांना युरोपातील 27 हून अधिक ठिकाणी पोहचण्याचा मार्ग मोकळा होईल. एअर इंडियाने ही नवीन विमानांसाठी मोठी डील केली आहे.
इंडिगोने यापूर्वीच एअरबस कंपनीला 500 विमानांची ऑर्डर दिलेली आहे. एअरलाईन्सच्या विस्तारीकरणाच्या योजनेनुसार 2030 पर्यंत नवीन विमाने ताफ्यात दाखल होतील. नवीन विमानतळांमध्ये इंग्लंड, फ्रांस, इटली, आर्यलंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमधील प्रमुख शहरांचा सहभाग आहे. एअरलाईन्सचे भारतात 76 ऑनलाईन पॉईंट आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, इंडिगोच्या प्रवाशांना दिल्ली-मुंबई,इस्तुंबलसह युरोपात सहज पोहचता येईल.
इंडिगोचे आंतरराष्ट्रीय विपणन प्रमुख विनय मल्होत्रा यांनी विस्तारीकरणासाठी कंपनीने 500 विमानांची ऑर्डर दिल्याचे सांगितले. सध्या इंडिगो एका दिवसात 1800 उड्डान करते. यामधील 10 टक्के विमान हे आंतरराष्ट्रीय मार्गावरील आहेत. या नवीन भागीदारीमुळे प्रवाशांना आता थेट युरोपापर्यंत उड्डाण करता येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवाचा लाभ दूरपर्यंत घेता येईल.
इंडिगोने सध्या युरोपवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यातंर्गत या नवीन कराराचा फायदा होईल. त्यामुळे ग्राहकांना कमी त्रासात, एकदाच सर्व प्रक्रिया पार पाडून किफायतशीर दराने युरोप गाठता येणार आहे. इंडिगो लवकरच केनियाची राजधानी नैरोबी आणि इंडोनेशियातील जकार्तामध्ये त्यांची उड्डाण सुरु करणार आहेत. इंडिगोने यापूर्वीच एअरबस कंपनीला 500 विमानांची ऑर्डर दिलेली आहे. एअरलाईन्सच्या विस्तारीकरणाच्या योजनेनुसार 2030 पर्यंत नवीन विमाने ताफ्यात दाखल होतील.
टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले. त्यानंतर एअर इंडियाच्या विस्ताराची मोठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 840 विमानांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे. आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. सध्या एअर इंडियाकडे 113 विमान आहेत. सध्या कंपनीकडे 1,600 पायलट आहेत.
एअर इंडियाने 470 विमानांसाठी ठेका दिला आहे. ज्यामध्ये एअरबसकडून 250 विमान आणि बोईंग कंपनीकडून 220 विमान खरेदी करण्यात येणार आहे. सीएफएम इंटरनॅशनल, रॉल्स-रॉयस आणि जीई एअरोस्पेस सोबत इंजिनाच्या देखभालीसाठी डील केली आहे.