Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : अदानींना अंबानींच्या व्याह्यांचे आव्हान, ‘ या’ सरकारी कंपनीच्या खरेदीसाठी बोली; कोण मारणार बाजी?

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकराने 100 टक्के भागीदारी विक्रीच्या निर्णयावर मोहोर उमटविली होती. कंपनीच्या खरेदीसाठी प्रारंभीच्या टप्प्यावर सात बोलीदार पुढे सरसावले होते.

Mukesh Ambani : अदानींना अंबानींच्या व्याह्यांचे आव्हान, ‘ या’ सरकारी कंपनीच्या खरेदीसाठी बोली; कोण मारणार बाजी?
अदानींना अंबानीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:35 PM

नवी दिल्लीकेंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खासगीकरणाला (PRIVATISATION) गती दिली आहे. आरोग्य उत्पादन क्षेत्रातील सरकारी कंपनी एचएलएल लाईफकेअर मधील भागीदारी विक्रीचा केंद्रानं निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकराने 100 टक्के भागीदारी विक्रीच्या निर्णयावर मोहोर उमटविली होती. कंपनीच्या खरेदीसाठी प्रारंभीच्या टप्प्यावर सात बोलीदार पुढे सरसावले होते. दरम्यान, एचएलएलच्या खरेदीसाठी गौतम अदानी (GAUTAM ADANI) व मुकेश अंबानीचे व्याही उद्योजक अजय पिरामल (AJAY PIRAMAL) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं वृत्त आहे. एचएलएल लाईफकेअर लिमिटेड (HAL LIFECARE LIMITED) ही भारतीय आरोग्य सेवा उत्पादन क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे संपूर्ण संनियंत्रण भारत सरकारच्या अखत्यारित आहे. गर्भनिरोधक उत्पादने, महिलांच्या आरोग्यविषयक उत्पादनांची निर्मिती एचएलएलच्या माध्यमातून केली जाते. एचएलएलच्या खरेदीत कोण बाजी मारणार याकडं अर्थवर्तृळाचं लक्ष लागलं आहे.

अदानी की पिरामल?

अदानी समूहानं सिमेंट क्षेत्रातील आघाडीच्या होल्सिम कंपनीमधील तब्बल 81,000 कोटी रुपयांच्या भागीदारीचा व्यवहार नुकताच पू्र्ण केला आहे. त्यामुळे अदानी समूह रुग्णालये, ऑनलाईन व डिजिटल फार्मसीच्या अधिग्रहणाद्वारे आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. याउद्देशानं अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेडचे गठन करण्यात आले आहे. अदानी हेल्थच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात कंपनीचा कार्यप्रवेश होईल. वैद्यकीय तपासणी व संनियंत्रणासोबतच आरोग्य क्षेत्राच्या संबंधित सेवा, संशोधन संस्था आदींची निर्मिती करणार आहे.

अदानी ग्रूपची ब्लॉकब्लस्टर डील

अदानी ग्रुपने सिमेंट व्यवहार क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. अदानी ग्रूपने जगातील आघाडीची सिमेंट कंपनी होल्सिम ग्रुपच्या अधिग्रहणाचा व्यवहार करार पूर्ण केला आहे. अदानी ग्रूपने भारतातील सर्वात मोठ्या दोन सिमेंट कंपन्या अंबुजा सिमेंट Ambuja Cement आणि एसीसी ACC मधील होल्सिम ग्रुपची संपूर्ण भागीदारी 10.5 अरब डॉलरला (80,800 करोड़ रुपये) खरेदी करण्याच्या व्यावसायिक कराराला अंतिम स्वरुप दिलं आहे. अदानी ग्रूपद्वारे पूर्णत्वास गेलंलं आजवरचं सर्वात मोठं अधिग्रहण मानलं जातं.

हे सुद्धा वाचा

पिरामल ग्रूपचं आव्हान-

पिरामल ग्रुप हा एक भारतीय बहुराष्ट्रीय व्यवहारात सक्रिय असलेला समूह आहे. आरोग्य सेवा, जीवन विज्ञान, औषध शोध, आरोग्य सेवा माहिती व्यवस्थापन, वित्तीय सेवा आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध क्षेत्रात पिरामल समूहाने मोठ्या प्रमाणात प्रकल्प हाती घेतले आहेत. एचएलएलच्या निमित्तानं अदानी ग्रूपसमोर पिरामलचं तगडं आव्हान असणार आहे.

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....