मुंबई : देशात महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते अन्नधान्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव आज वाढतच आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरबाबत बोलायचे झाल्यास घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो ग्रॅमच्या गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder) दर गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. एकीकडे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर (Petrol and Diesel) आकारण्यात येणाऱ्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे एलपीजी गॅसचे वाढत असलेले दर चिंतेत भर घातल आहेत. चालू महिन्यात सहा जूलैला घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या गॅसची किंतम पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता एका गॅस सिलिंडरसाठी तब्बल 1053 रुपये मोजावे लागणार आहेत.
देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. महागाईचा आलेख वाढतच आहे. ज्या पद्धतीने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत, त्यावरून महागाईचा अंदाज येतो. वाढत असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतींमुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये एलपीजी गॅसच्या दरात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. एक ऑगस्ट 2017 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ही 524 रुपये होती. आज ती वाढून एक हजार 53 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गॅसच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. 2017 ला गॅस सिलिंडरची किंमत 524 रुपये इतकी होती. 2018 ला गॅस सिलिंडरची किंमत वाढून 789.50 रुपयांवर पोहोचली. आणि आता तीने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. एलपीजी प्रमाणेच सीएनजी आणि पीएनजीची देखील तीच अवस्था आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये गॅसच्या दरात चढ-उतार सुरूच राहिली. मात्र तरी देखील गॅस दरवाढीचे प्रमाण जास्त असल्याने आज एका सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. 1 ऑगस्ट , 2019 रोजी गॅसच दर कमी होऊन 574.5 रुपये इतके झाले होते. मात्र त्यानंतर 2020 पासून सातत्याने गॅसच्या दरात वाढच होत आहे. घरगुती गॅससोबतच व्यवसायिक गॅसच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. व्यवसायिक गॅसचे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवण देखील महागले आहे.