Inflation : महागाईचा तोरा तर उतरणार, खाद्यतेल, गॅससह अन्नधान्याचे भाव होणार कमी, पण वाट पहावी लागणार थोडी..

Inflation : सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. महागाईच्या आघाडीवर त्यांना दिलासा मिळणार आहे..

Inflation : महागाईचा तोरा तर उतरणार, खाद्यतेल, गॅससह अन्नधान्याचे भाव होणार कमी, पण वाट पहावी लागणार थोडी..
महागाई होईल कमीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 10:23 PM

नवी दिल्ली : भारतच नाहीतर जगभरात महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या सर्वसामान्यांना (Common Man) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महागाई कधी कमी होईल हा मुद्दा आहे. तर येत्या वर्षात महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहे. तर दोन वर्षानंतर महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळू शकतो.

एका महिन्यानंतर पुढील वर्षी 2023 मध्ये कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल, कापसाचे पीक आणि धातू क्षेत्रात जवळपास सर्वांचेच भाव 15% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2024 मध्ये या किंमतीमध्ये 12% पर्यंत कमी येण्याचा अंदाज आहे.

यंदा कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस महागाई वाढीला कारणीभूत ठरले आहे. पुढील वर्षी या सर्वांचे भाव अत्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

भारतीय कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षी कच्चे तेल, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड जवळपास 17% कमी होईल. कच्चे तेलाचे भाव 75 डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता आहे. सध्या हा भाव 90 डॉलर च्या जवळपास आहे.

या भावामध्ये जून 2023 पर्यंत खाद्यतेलाच्या किंमतीतही मोठी कपात येण्याची शक्यता आहे. खाद्यतेल्याच्या किंमती मध्यंतरी उतरल्या होत्या. त्यात पुढील वर्षी कपात होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल 12-15% पर्यंत उतरतील अशी आशा आहे.

युक्रेनकडे सूर्यफूल तेलाचा मोठा साठा आहे. देशात मोहरीचे ही मोठे उत्पादन होते. तर पाम तेलाच्या निर्यातकापैकी एक श्रीलंकाही लवकरच तेलाचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे तेलाची कमतरता कमी होईल आणि खाद्यतेल स्वस्त होतील.

देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत नाही. तो दरवर्षी वाढत आहे. रब्बी हंगामात गहुचे उत्पादन 10-15% वाढू शकते. तर मक्याचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती कमी होतील.

कापसाचे उत्पादन 8.5% वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतही उत्पादन जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारताच्या कापसाच्या बाजारात सध्या स्पर्धा सुरु आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.