4 महिन्यांच्या नातवाकडे 15 लाख शेअर, नारायण मूर्ती यांच्या कुटुंबात कोणाकडे Infosys मध्ये किती वाटा
Infosys Share | देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या नातवाची शेअरधारक म्हणून एंट्री झाली आहे. त्यांनी नातावाच्या नावे 15 लाख शेअर केले. जगात येताच हा पठ्ठ्या अब्जाधीश झाला. इतर सदस्यांकडे पण असे शेअर आहेत.
नवी दिल्ली | 19 March 2024 : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये (Infosys) नवीन स्टेकहोल्डर आला आहे. कंपनीचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 4 महिन्यांच्या नातवाच्या नावे 15 लाख शेअर केले. त्यांनी भेट म्हणून हे शेअर दिले आहेत. या शेअरची किंमत 240 कोटी रुपये इतकी आहे. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती यांचा मुलगा एकाग्र रोहन हा देशातील Youngest Millionaire ठरला आहे. इतर सदस्यांच्या नावे इन्फोसिसचे इतके शेअर आहेत.
- एकाग्र रोहन मूर्ती – या कुटुंबातील सर्वात छोटा सदस्य आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र हा चार महिन्यांचा आहे. तो रोहन मूर्ती यांचा मुलगा आहे. आजोबांनी एकाग्रला या वयातच अब्जाधीस केले आहेत. गिफ्ट म्हणून इन्फोसिसचे 15 लाख शेअर दिले. या शेअरची किंमती 240 कोटी रुपये इतकी आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये केलेल्या फायलिंगनुसार, भेट म्हणून मिळालेल्या या शेअरमुळे एकाग्र रोहन मूर्ती इन्फोसिस कंपनीत 0.04 टक्क्यांचा वाटेकरी झाला आहे.
- एन. आर. नारायण मूर्ती – वर्ष 1981 मध्ये इन्फोसिसची स्थापना सात मित्रांनी केली होती. सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्याकड डिसेंबर 2023 च्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीत त्यांचा वाटा 0.40 टक्के इतका आहे. तर त्यातील 0.04 टक्के वाटा त्यांनी नातू एकाग्र रोहन मूर्ती यांच्या नावे केला आहे. त्याआधारे विचार करता नारायण मूर्ती यांच्याकडे आता 0.36 टक्के वाटा आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्याकडे कंपनीचे 1.51 कोटी शेअर आहेत.
- सुधा मूर्ती – नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती एक व्यायसायिक आणि प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचे या कंपनीत 0.93 टक्के वाटा आहे. डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सुधा मूर्ती यांच्याकडे 3,45,50,626 Share आहेत. व्यवसायीक घौडदौडीनंतर सुधा मूर्ती यांनी आता राजकीय जीवनात प्रवेश केला आहे. त्यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आले आहे.
- अक्षता मूर्ती – नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती आहे. सध्याचे ब्रिटनेच पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या त्या पत्नी आहेत. अक्षता यांचा इन्फोसिसमध्ये मोठा वाटा आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, युकेच्या फर्स्ट लेडीकडे, इन्फोसिसमध्ये 3,89,57,096 शेअर आहेत. तिचा कंपनीतील वाटा जवळपास 1.05 टक्के इतका आहे. अक्षता आणि ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
- रोहन मूर्ती – नारायण-सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती याचा इन्फोसिसमध्ये मोठा वाटा आहे. त्याच्याकडे कंपनीचे 6,08,12,892 इतके शेअर आहेत. त्याचा कंपनीत 1.64 टक्के इतका वाटा आहे. रोहन मूर्ती पण लंडनमध्ये राहतो. येथे त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोहन AI कंपनी Soroco चा सहसंस्थापक आहे. तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहे. सोरोको कंपनीचा वर्ष 2022 मधील महसूल 150 कोटी रुपये इतका होता. रोहन याने हॉर्वर्ड विद्यापीठातून कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली आहे.
हे सुद्धा वाचा