देशातील ज्येष्ठ नागरिकांना विम्याचा दावा (Insurance claim) मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. एका सर्वेक्षणात आढळून आले आहे की, विमा कंपन्या पॉलिसी देण्यास खूप धावपळ करतात मात्र, त्याच पॉलिसीचा परतावा देण्यास ज्येष्ठ नागरिकांना (To senior citizens) खूप उशीर लावतात. या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा खूप महाग दराने विमा दिला जातो. विमा ब्रोकर्स SecureNow ने एका सर्वेक्षणात म्हटले आहे की, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना विमा दावा लवकर मिळतो. पण यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी एक आठवडा अतिरिक्त वेळ (Extra time) लागतो. हे सर्वेक्षण आरोग्य विमा घेणाऱ्या 1,250 ग्राहकांमध्ये करण्यात आले. यामध्ये 576 ज्येष्ठ नागरिक होते. सर्वसामान्यपणे 23.2 दिवसात विमा क्लेम मिळत असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. परंतु याच तुलनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ते मिळण्यासाठी 28 दिवस लागतात.
सर्वसामान्यांना 23.2 दिवसांत विमा क्लेम मिळत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ते मिळण्यासाठी 28 दिवस लागतात. ज्येष्ठ नागरिकांना दावा जलदगतीने मिळावा यासाठी विमा कंपन्यांकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा दावा मिळण्यास विलंब होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कारण ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विमा कंपनीला लवकर कळवू शकत नाहीत. तसेच, ते बराच काळ रुग्णालयात राहतात. याशिवाय उपचाराचा खर्चही जास्त असतो. अशा स्थितीत विमा कंपन्यांना हे सर्व निकाली काढण्यासाठी वेळ लागतो.
जर एखाद्या 30 वर्षांच्या व्यक्तीने काही आरोग्य विमा खरेदी केला आणि त्याचा प्रीमिअम 10 हजार 365 रुपये असेल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच प्रीमिअम 31 हजार 905 रुपये होईल. 45 वर्षांच्या व्यक्तीसाठी हा प्रीमिअम 15 हजार 239 रुपये होतो. 75 वर्षांच्या व्यक्तीला यासाठी 66 हजार 368 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य विमा उत्पादन निवडणेही अवघड काम आहे. अतिसार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे दावे मिळण्यास अधिक विलंब होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.