Insurance | विमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल

Insurance | गेल्या काही वर्षांपासून विमा क्षेत्रात अनेक बदल होत आहे. सातत्याने विविध अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकार विमा क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, न आवडलेली पॉलिसी विमा कंपनीला परत करण्यावर गांभीर्याने विचार होत आहे. त्यासाठी विमा नियामक IRDAI ने प्रस्ताव दाखल केला आहे.

Insurance | विमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 2:15 PM

नवी दिल्ली | 15 February 2024 : विमा क्षेत्रात केंद्र सरकार अमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. अनेक सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बदल होत आहे. आता ग्राहकांना, त्याला न आवडलेली विमा पॉलिसी परत करता येणार आहे. वाहन खरेदीपूर्वी ट्रायल घेण्यात येते. त्याच धरतीवर ग्राहक विमा पॉलिसी ट्रायलवर खरेदी करु शकतो. ग्राहकांना विमा कंपनी भूलथापा देत असल्याचे लक्षात आल्यास पॉलिसी परत करण्याविषयीचा यापूर्वीचा नियम सोपा करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर 15 दिवसांचा सध्याचा कालावधी वाढून तीस दिवसांचा होईल.

30 दिवसांचा कालावधी

इरडाने यासाठी एक ड्राफ्ट तयार केला आहे. यामध्ये विम्यासंबंधीत विविध नियमांना एकत्रित करण्याची वकिली करण्यात आली आहे. या नवीन प्रस्तावात ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विमा पॉलिसी ट्रायलची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यानुसार, फ्री लूकसाठी 30 दिवसांचा प्रस्ताव ठेवला आहे.म्हणजे विमा पॉलिसी सुरु झाल्यापासून ते पुढील तीस दिवसांत ग्राहकांना पॉलिसी न आवडल्यास ती परत करता येईल.

हे सुद्धा वाचा

या प्रस्तावाचा अर्थ तरी काय?

विमा नियामक इरडाने पॉलिसी परत घेण्यासाठी निश्चित यापूर्वीचा 15 दिवसांचा कालावधी आता 30 दिवसांपर्यंत वाढवला आहे. तर जीवन विमा पॉलिसीसाठी नामांकन अनिवार्य करण्याचा बुधवारी प्रस्ताव सादर केला. सध्याच्या विमाधारकाला पॉलिसीचे नियम व अटी योग्य वाटल्या नाही, अथवा विमा पॉलिसी योग्य न वाटल्यास ती परत करता येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक पॉलिसी प्रकरणात आता कालावधी वाढवून तो 30 दिवसांचा करण्यात आला आहे.

तर करा परत पॉलिसी

  • तुम्ही कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केली
  • त्यातील एखादी अट वा शर्त तुम्हाल खटकली
  • या पॉलिसीत जास्त फायदा दिसला नाही
  • भविष्यासाठी त्यातील गुंतवणूक फायदेशीर वाटली नाही
  • तर सध्या ही पॉलिसी 15 दिवसांत परत करता येते
  • नवीन प्रस्तावानुसार हा कालावधी 30 दिवसांचा करण्यात येईल
Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.