Penny Stock : 3 रुपयांच्या शेअरची कमाल; गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या, LIC ने पण केली शेअरची खरेदी

Integra Essentia Share : या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीचा शेअर आज 4 टक्क्यांपर्यंत वधारला. हा पेनी स्टॉक असला तरी त्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. हा शेअर मंगळवारी 4.09 रुपयांवर पोहचला आहे. ही त्याची इंट्रा डेची उच्चांकी कामगिरी आहे.

Penny Stock : 3 रुपयांच्या शेअरची कमाल; गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या, LIC ने पण केली शेअरची खरेदी
रॅडिको खेतानवर Sharekhan ने BUY चा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 2128-2319 रुपये आहे. येत्या 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 4:51 PM

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर आज मंगळवारी वधारला. पेनी शेअर तसे जोखीमेचे असतात. कंपनीचा शेअर आज 4 टक्क्यांपर्यंत वधारला. हा शेअर आज 4.09 रुपयांवर आला. ही त्याची उच्चांकी कामगिरी आहे. 10 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या स्मॉल कॅप स्टॉकला गुंतवणूकदारांनी पसंती दिली. हा शेअर सुरुवातीच्या सत्रातच सूसाट सुटला आणि त्याने मोठी मजल मारली. सोमवारी हा शेअर 3.97 रुपयांवर बंद झाला.

ऑर्डर मिळताच स्टॉक सूसाट

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर तेजीत आला आहे. स्मॉल कॅप स्टॉकने शनिवारी जाहीर केले की, ॲग्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी कंपनीला 28 कोटी रुपयांची महत्वपूर्ण ऑर्डर मिळाली आहे. सेवा आणि उत्पादनातील गुणवत्तेचे हे जणू प्रतिक असल्याचा दावा कंपनीने केला. मोठ्या ऑर्डरमुळे गुंतवणूकदारांनी या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली.

हे सुद्धा वाचा

LIC चा मोठा वाटा

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचे मार्केट कॅप 404 कोटी रुपये इतके आहे. या स्मॉलकॅप स्टॉकचा NSE वरील 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर 7.69 रुपये प्रति शेअर होता. तर या शेअरचा गेल्या 52 आठवड्यातील निच्चांकी स्तर 2.50 रुपये प्रति शेअर असे आहे. मार्च 2024 तिमाहीच्या अखेरीस एलआयसीचा या कंपनीत वाटा होता. एलआयसीने त्यातून कमाई केली. या कंपनीच्या मार्च 2024 मधल शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार एलआयसीची या कंपनीत 1.06 टक्क्यांची हिस्सेदारी होती.

ONGC च्या शेअरची किंमत किती

तिमाही निकालाचा परिणाम आज ओएनजीसीच्या शेअरवर झाला आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी तेजीत दिसला. बीएसईच्या सुरुवातीच्या सत्रात ओएनजीसीचा शेअरमध्ये 4 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर 322.45 रुपयांवर पोहचला. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. बाजार बंद होताना हा शेअर 307.40 रुपयांवर होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.