निष्क्रिय बँक खात्यावरही व्याज उपलब्ध, पैशांची गरज असल्यास पुन्हा सक्रिय करु शकता खाते
जर बँक खात्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ व्यवहार केला गेला नाही तर ते निष्क्रिय होते. आरबीआयच्या नियमांनुसार, असे खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. (Interest is also available on inactive bank account, you can reactivate the account if you need money)
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे प्रत्येक जण हैराण आहे. महामारीमुळे अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत किंवा त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. संसर्ग आणि वाढती महागाई पाहता प्रत्येकाला आवश्यक त्या खर्चासाठी पैशांची गरज असते. अशा परिस्थितीत आपले बंद पडलेले बँक खाते उपयुक्त ठरू शकते. खास गोष्ट म्हणजे हे बंद बँक खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरजही भासणार नाही. तसेही बँक शाखांमधील कामकाज मर्यादित केले आहे. बँक शाखांमध्ये होणाऱ्या संक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी, फारच कमी बँकिंग सेवा दिल्या जात आहेत. परंतु आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. आपण घरी बसल्या पुन्हा आपले बंद झालेले बँक खाते सक्रिय करू शकता. त्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. (Interest is also available on inactive bank account, you can reactivate the account if you need money)
बँक खाती का होतात निष्क्रिय?
जर बँक खात्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ व्यवहार केला गेला नाही तर ते निष्क्रिय होते. आरबीआयच्या नियमांनुसार, असे खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की खाते निष्क्रिय होणे म्हणजे फ्रीज होणे असा अर्थ होत नाही. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी दीर्घकाळ सक्रिय नसलेले खाते निष्क्रिय केले जाते.
खाते निष्क्रिय करण्यापूर्वी बँक संपर्क साधते
जेव्हा 2 ते 3 वर्षे बँक खात्यात कोणताही व्यवहार होत नाही, तेव्हा ते खाते निष्क्रिय केले जाते. जर एक वर्ष खात्यात व्यवहार झाला नाही तर बँक ग्राहकांशी संपर्क साधते. ग्राहकाकडून प्रतिसाद न मिळाल्यास हे खाते निष्क्रिय केले जाते. 10 वर्षे कोणताही व्यवहार न केल्यास, बँक खाते निष्क्रिय घोषित केले जाते. असे खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. जर एखाद्या ग्राहकाला त्याच्या खात्यात कोणताही व्यवहार करायचा नसेल तर तो ते कायमचे बंद करू शकतो. बँक आपल्या वतीने कोणतेही खाते बंद करत नाही.
निष्क्रिय बँक खात्यावर किती शुल्क लागते?
साधारणतः खात्यात किमान शिल्लक नसेल तर बँका ग्राहकांकडून शुल्क आकारतात. परंतु निष्क्रिय खाते सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वर्ष 2014 मध्ये, आरबीआयने एक परिपत्रक जारी केले होते. यात असे म्हटले होते की निष्क्रिय खात्यांमध्ये किमान शिल्लक नसल्यास बँका ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू शकत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या बँक खात्याची स्थिती काहीही असली तरी त्यामध्ये नियमित व्याज क्रेडिट असेल.
बँक खाते कसे सक्रिय करावे?
निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी, खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या बँक शाखेत ईमेल पाठवावा लागेल. तसेच, ओळख आणि केवायसी प्रक्रियेसाठी ओळख पुरावा आणि निवासाचा पुरावा सादर करावा लागेल. यानंतर, काही दिवसात बँक आपले खाते पुन्हा सक्रिय करतील. बर्याच बँकांमध्ये केवायसी प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्ण केली जाते. (Interest is also available on inactive bank account, you can reactivate the account if you need money)
कार मेंटेनन्सचं टेन्शन विसरा, Hyundai चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली#Hyundai #HyundaiIndia #CoronaPandemic #CoronaSecondWave #LockdownMaharashtra https://t.co/txMxUBecFq
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2021
इतर बातम्या
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा