Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Tips : खरेदी झाली, ऐन पेमेंट करताना इंटरनेट झाले बंद? तरीही करा असे UPI Payment

UPI Tips : अनेकदा आपली खरेदी होते. एखादी वस्तू खरेदी करुन होते. बिलिंग काऊंटरवर आले की इंटरनेट काही काम करत नाही. वॅलेटमध्ये पैसे नसतात. अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. या पद्धतीने विना इंटरनेट तुम्ही युपीआय पेमेंट करु शकतात. काय आहे ही ट्रिक?

UPI Tips : खरेदी झाली, ऐन पेमेंट करताना इंटरनेट झाले बंद? तरीही करा असे UPI Payment
युपीआय पेमेंट विना इंटरनेट
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 3:08 PM

देशात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे युपीआयचा (UPI) दिल्लीपासून गल्लीबोळात वापर होत आहे. हातगाडीवरील भाजी खरेदी असो वा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबणे असो युपीआय पेमेंट्मुळे व्यवहार सुटसुटीत आणि झटपट झाला आहे. जगातील काही देशांमध्ये सुद्धा युपीआय लोकप्रिय होत आहे. भारतातील पर्यटक आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. पण युपीआय केवळ इंटरनेट फोनवरच चालते असा समज डोक्यातून काढून टाका, तुमच्या साध्या बेसिक मोबाईलवरुन पण युपीआय पेमेंट करता येते.

बेसिक फोनवरुन करा व्यवहार

NPCI नुसार, फीचर फोन युझर्ससाठी IVR नंबरद्वारे UPI व्यवहार करता येईल. त्यासाठी ग्राहकांना, वापरकर्त्यांना आयव्हीआर क्रमांक (080-45163666, 08045163581 आणि 6366200200) वर कॉल करावा लागेल. त्यावर तुमचा युपीआय आयडी व्हेरिफाय, पडताळा करावा लागेल. आता तुम्हाला कॉलवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागले. त्याआधारे पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

*99# लक्षात ठेवा

विना इंटरनेट USSD च्या माध्यमातून पण तुम्ही UPI पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला *99# लक्ष्यात ठेवावे लागे. सर्वात अगोदर तुम्हाला GSM स्मार्टफोन पर ‘*99#’ ही सेवा सुरू करावी लागेल. UPI 123Pay सेवा सर्वच मोबाईल सेवा कंपन्या देत नाहीत. त्यासाठी अगोदर कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी लागेल.

काय आहे युपीआय

भारताने डिजिटल पेमेंट सेवेत मोठे पाऊल टाकले आहे. तुम्ही घरबसल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून रक्कम पाठवू शकता, हस्तांतरीत करू शकता. युपीआयसाठी आता देशात अनेक कंपन्या समोर आल्या आहेत. पेटीएम, फोनपे, भीम, गुगलपे यासह अनेक प्लॅटफॉर्म तुम्हाला युपीआयचा वापर करण्यासाठी मदत करतात. युपीआय ग्राहकांना स्कॅनर, मोबाईल क्रमांक, युपीआय आयडी यापैकी एका माहिती आधारे रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी मदत करते.

ई-वॅलेटचा वापर

पेटीएम, गूगल पे, फोन पे इतर युपीआय ॲपप्रमाणेच आता युपीआय लाईट(UPI Lite) तुमची ही चिंता मिटवणार आहे. तुम्हाला सहज कुठेही रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे. काही छोटे व्यवहार या माध्यमातून पूर्ण करता येतील. विनाइंटरनेट हा व्यवहार पूर्ण होणार आहे. त्यासाठी केवळ ॲप उघडायचं आणि पेमेंट करायचे आहे. ॲपच्या सहाय्याने कोणालाही छोट्या रक्कमेचा व्यवहार पूर्ण करता येईल. या ई-वॅलेटच्या मार्फतव्यवहार विना पिन, विना इंटरनेट आणि विना स्मार्टफोन द्वारे तात्काळ करु शकता.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.