Gold Bond Scheme : सुवर्णसंधी! स्वस्तात खरेदी करा सोने, जोरदार परताव्यासह मिळवा सरकारची हमी

Gold Bond Scheme : स्वस्तात सोने खरेदीची नागरिकांना सुवर्णसंधी मिळाली आहे. केंद्र सरकारने पुन्हा सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली आहे. या योजनेत जोरदार परताव्यासह केंद्र सरकारची हमी मिळते. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होत नाही.

Gold Bond Scheme : सुवर्णसंधी! स्वस्तात खरेदी करा सोने, जोरदार परताव्यासह मिळवा सरकारची हमी
स्वस्तात सोने खरेदीची संधी
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:15 PM

नवी दिल्ली : स्वस्तात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सरकारी येत्या सोमवारपासून स्वस्तात सोने खरेदीची संधी, नागरिकांना देत आहे. गुंतवणूकदार 6 मार्च 2023 रोजीपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत (SGB) गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ग्राहकांना पाच दिवसांत सोने खरेदी करता येईल. या गोल्ड बाँडसाठी एक ग्रॅम सोन्याचा भाव 5,611 रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याविषयीची सूचना दिली. त्यानुसार, 2022-23 च्या चौथ्या मालिकेतील सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond scheme 2022-23 -Series-IV) खरेदीसाठी पाच दिवसांचा कालावधी असले.

सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत 6 ते 10 मार्च या काळात स्वस्त सोने खरेदीची संधी मिळेल. सोमवारपासून जनतेला या योजनेत गुंतवणूक करता येईल. सोन्याचा भाव 5,611 रुपये प्रति ग्रॅम आहे. सेंट्रल बँकेने एक अधिकृत निवेदन दिले आहे. त्यानुसार, ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसमध्ये 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडची इश्यू प्राईस एका ग्रॅमसाठी 5,561 रुपये असेल.

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या सवलत मिळते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना बाँड जारी करण्यात येईल. गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 999 शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित होतो.

हे सुद्धा वाचा

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोपं आहे. या योजनेत सोमवारपासून गुंतवणुकीची संधी मिळत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.