अक्षय तृतीयेला सोने, बॉन्ड्स किंवा ईटीएफमध्ये करा गुंतवणूक, 2-3 महिन्यांत मिळेल जबरदस्त परतावा
तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. तसेच दोन्हीमध्ये दोन ते तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते. (Invest in physical gold, bonds or ETFs, You will get a tremendous return)
नवी दिल्ली : हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. यावेळी हा उत्सव 14 मे रोजी आहे. आपण सोन्यात गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. तसेच दोन्हीमध्ये दोन ते तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते. म्हणून फिजिकल सोने, बाँड्स किंवा ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर सौदा असू शकते. (Invest in physical gold, bonds or ETFs, You will get a tremendous return)
बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील एका वर्षात सोने 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. मागील 10 ते 11 वर्षांचा परतावा इतिहास पाहिला तर सोन्यात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. मे नंतर ते स्थिर होईल आणि जून, जुलै आणि ऑगस्टपासून सोन्याद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकेल. यावेळी, देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 47 हजारांच्या जवळ आहे. कोरोना महामारी असूनही, गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
दोन ते तीन महिन्यांत मिळवा चांगले उत्पन्न
बाजार विश्लेषकांच्या मते मध्यम मुदतीत सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात. अक्षय तृतीयेपासून पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत सोन्यात गुंतवणूक करणे आपल्याला स्वस्त पडेल. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तीन महिन्यांनंतर तुम्हाला यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ
यूएस यील्डमधील घट आणि अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणामुळे गुंतवणूकदार जागतिक स्तरावर सोन्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही होत आहे. केंद्रीय बँका देखील सोन्याची खरेदी करीत आहेत, ज्यामुळे याच्या किंमतीला पाठिंबा दर्शविला आहे. एसबीआयच्या इकोराप संशोधन अहवालानुसार भारतात कोरोना साथीच्या आजारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे.
13 हजारांपर्यंत परतावा मिळण्याची संधी
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने 56 हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. यावेळी सुमारे 9 हजार रुपयांच्या सवलतीत सोने उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ आहे. येत्या वर्षात सोने 55-60 हजारांची पातळी ओलांडू शकेल. याद्वारे गुंतवणूकदारांना 13 हजारांपर्यंत परतावा मिळू शकेल.
गोल्ड बॉन्ड्स आणि ईटीएफ देखील एक चांगला पर्याय
जर आपण सोन्याच्या शुद्धतेबद्दल संभ्रमित असाल किंवा चोरीच्या भीतीने ते विकत घेऊ इच्छित नसाल तर गोल्ड बॉन्ड किंवा ईटीएफ हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला सोन्याचे नाणी किंवा दागिने खरेदी करण्याची गरज नाही. आपण सरकारने जारी केलेल्या सार्वभौम सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये 8 वर्षांचा लॉक इन पिरीयड असतो, म्हणजे यापूर्वी आपण त्यातून पैसे काढू शकत नाही. परंतु लॉक-इन मुदतीनंतर, मॅच्युरिटीला आयकर सूटसह 2.5 सुनिश्चित परतावा मिळतो. यात गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी एक युनिट म्हणजेच 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल.
गोल्ड ईटीएफ हा एक ओपन-एन्डेड म्युच्युअल फंड आहे. याचा भाव सोन्याची घसरण आणि वाढत्या भावानुसार बदलतो. फिजिकल सोन्याच्या तुलनेत खरेदी शुल्क कमी आहे. यात गुंतवणूकदारास 100 टक्के सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळते. एसआयपीद्वारे आपण त्यात गुंतवणूक देखील करू शकता. (Invest in physical gold, bonds or ETFs, You will get a tremendous return)
पैशांची बचत आणि निसर्गांचं संवर्धन, पेट्रोल कार्सपेक्षा दमदार, ‘या’ आहेत देशातील टॉप CNG गाड्या#PetrolDieselPriceHike #petrolPrice #PriceHike #CNG #CNGCarshttps://t.co/8nuhUcxMuv
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
इतर बातम्या
ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?
Video: मराठवाड्यात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर