‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

आयसीआयसीआय बँकेच्या शेअर खरेदीचा सल्ला शेअरखानने दिला आहे. शेअरखानने शेअरसाठी 970 चे लक्ष्य ठेवले आहे. हा स्टॉक सध्या 718 च्या पातळीवर आहे.

'या' बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:33 PM

कोरोना महामारीच्या प्रभावातून देशातील बँकिंग क्षेत्र (Banking Sector) बाहेर येत असल्याचे संकेत गेल्या तिमाहीच्या निकालांनी दिले आहेत. भारतातील बँकांची अ‍ॅसेट क्वालिटी सुधारत आहे आणि त्यात दिवसागणिक गतिने सुधारणा होत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. परिणामी देशातील अनेक मोठ्या बँकांनी ब्रोकिंग फर्मचा विश्वास संपादित केला आहे. ब्रोकरेज हाऊस शेअर खान (Share Khan-Broker House) यांनी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) हा बाजारातील खेळाडू ठरेल असा भरवसा दिला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ऋण वसुलीत इतर खासगी बँकांच्या तुलनेत आयसीआयसीआय बँक अग्रेसर असेल, अशी ब्रोकरेज हाऊसची अपेक्षा आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर खरेदीचा सल्ला शेअरखानने दिला आहे. गेल्या वर्षी हा स्टॉक 573 अंकावर होता. त्यात पडझड सुरु होती. त्यानंतर तो 700 अंकावर पोहचला. यंदा तो 740 अंशावर तर पुढे 800 अंकाचा टप्पा ही त्याने पार केला. त्यानंतर त्यात घसरण झाली. आता शेअरखानने या शेअरसाठी 970 चे लक्ष्य ठेवले आहे.

स्टॉक्सबाबत काय सल्ला आहे?

आयसीआयसीआय बँकेचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला शेअरखानने दिला आहे. शेअरखानने शेअरसाठी 970 चे लक्ष्य ठेवले आहे. सध्या हा स्टॉक 718 अंकावर खेळत आहे, म्हणजेच या पातळीवरूनही शेअरमध्ये आणखी झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. शेअरच्या थांब्यावरून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर 35 टक्के परतावा मिळू शकतो. हा शेअर वर्षभरात 859 या उच्चांकी पातळीवर तर 531 या निचांकी पातळीवर पोहचला होता. शेअरखानच्या मते, आगामी काळात हा स्टॉक त्याची दमदार कामगिरी दाखवून या वर्षातील सर्वोच्च पातळीवर जाऊ शकतो. 2022 मध्ये या शेअरचा परतावा फारसा समाधानकारक नव्हता उलट तो नकारात्मक होता. परंतू, ही पडझड थांबली. स्टॉकमध्ये जास्त घसरण झाली नाही. वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक 740 अंकावर होता. मात्र गेल्या वर्षभरात 573 अंकावरील हा शेअर 700 अंकांच्या पातळीवर पोहचला आहे.

का वाढल्यात अपेक्षा?

शेअर खानच्या अहवालानुसार, सर्वच खासगी क्षेत्रातील बँकांनी उत्तम कामगिरी केली आहे. कोरोनाच्या छायेतून बँका बाहेर पडत आहेत आणि कर्ज वितरणातही त्यांनी आघाडी घेतली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज वसुली आणि वितरणात आघाडीवर असेल. तसेच डिजिटल बँकिंगमुळेपण बँकेला मोठा फायदा होत आहे. शेअर खानच्या दाव्यानुसार, यावेळी बँकेच्या स्टॉकची कामगिरी सुधारत आहे. जानेवारी महिन्याच्या अंतिम काळात या स्टॉकने 800 अंकांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे भविष्यात हा स्टॉक 970 अंकाचे लक्ष गाठेल अशी आशा शेअर खानला वाटत आहे.

(महत्वाची सूचनाः गुंतवणूक विषयीची ही माहिती ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यावर आधारीत आहे. स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करुन आणि तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज

Petrol Diesel Prices Today : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातले काय आहेत भाव?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.