Savings Scheme : पोस्टाच्या ‘या’ तीन योजनांमध्ये पैसे गुंतवा; मिळवा कमी जोखीमेमध्ये अधिक परतावा
पूर्वी कोणाला पत्र पाठवायचे असेल तर पत्र पाठवणे एवढंच पोस्टाचं काम होतं. मात्र आता बदलत्या काळात पोस्टाने देखील अनेक बदल घडून आणले आहेत. आता केवळ संदेशाची देवाण-घेवाण करणे एवढचं पोस्टाचं काम राहिलं नसून, आर्थिक क्षेत्रात पोस्ट खात्याने आपला दबदबा निर्माण केला आहे.
पूर्वी कोणाला पत्र पाठवायचे असेल तर पत्र पाठवणे एवढंच पोस्टाचं काम होतं. मात्र आता बदलत्या काळात पोस्टाने देखील अनेक बदल घडून आणले आहेत. आता केवळ संदेशाची देवाण-घेवाण करणे एवढचं पोस्टाचं काम राहिलं नसून, आर्थिक क्षेत्रात पोस्ट खात्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. इंडिया पोस्ट बँकेने (India Post Bank) अशा अनेक योजना (Savings Scheme) सुरू केल्या आहेत, ज्या योजना बँकांच्या (Bank) तोडीस तोड आहेत. एवढेच नव्हे तर या योजनांमध्ये बँकामधील एफडीपेक्षा अधिक परतावा मिळतो. सोबतच सुरक्षिततेची हमी देखील मिळते. समजा तुम्ही एखाद्या बँकेत एफडी केली आहे. आणि त्या बँकेचे दिवळे निघाले तर सरकारी नियमानुसार तुम्हाला केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम वापस मिळते. मात्र पोस्टाचे तसे नाही. इथे तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते. त्यामुळेच पोस्टाच्या योजना लोकप्रिय ठरत असून, दिवसेंदिवस पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. आज आपण पोस्टाच्या अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एफडीपेक्षा अधिक परतावा मिळतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम हे पोस्टाच्या वतीने चालवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून सध्या ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर 7.4 टक्के इतका व्याज दर मिळत आहे. तुम्ही एखाद्या बँकेत जर एफडी केली तर तुम्हाला एफडीवर कोणतीही बँक इतका जास्त व्याज दर देत नाही. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दर तीन महिन्याला व्याज बँकेच्या खात्यात जमा होते. मात्र ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच असून, ज्येष्ठ नागरिक एकटे किंवा आपल्या पत्नीसोबत मिळून जॉईंट खाते खोलू शकतात. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे टॅक्स फ्री आहे.
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही आणखी एक चांगला परतावा देणारी योजना पोस्ट बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेला पीपीएफ असेही म्हणतात. ही एक स्मॉल सेव्हिग स्कीम आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स लागत नाही. या योजनेंतर्गत 7.1 टक्के इतका व्याद दर देण्यात येतो.
सुकन्या समृद्धी योजना
ही पोस्टाची सर्वात लोकप्रिय योजना आहे. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेपेक्षा अधिक चांगली योजना दुसरी असूच शकत नाही. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैशांची तरतूद करायची आहे, ते या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 7.6 दराने व्याज देण्यात येते.