Whisky Investment : सोन्याने नाही, दारुने केले मालामाल! दहा वर्षांतील आकडे बोलतात ना राव

Whisky Investment : गुंतवणूकदारांना गेल्या दहा वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीने सर्वाधिक मालामाल केले असा समज असेल तर तो खोडून निघाला आहे. सोन्यापेक्षा व्हिस्कीने, दारुने गुंतवणूकदारांना श्रीमंत केल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

Whisky Investment : सोन्याने नाही, दारुने केले मालामाल! दहा वर्षांतील आकडे बोलतात ना राव
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:17 PM

नवी दिल्ली : सोने हे गुंतवणुकीचे (Gold Investment) सर्वात सुरक्षित साधन मानण्यात येते. गुंतवणूकदारांना गेल्या दहा वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीने सर्वाधिक मालामाल केले असा समज असेल तर तो खोडून निघाला आहे. सोन्यापेक्षा व्हिस्कीने, दारुने गुंतवणूकदारांना श्रीमंत केल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. सोन्याच्या गुंतवणूकदारांना केवळ 44 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामानाने व्हिस्कीत (Rare Whisky) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची छप्पडफाड कमाई (Income) झाली आहे. दहा वर्षांतील परताव्याची टक्केवारी सर्वांनाच थक्क करणारी आहे. त्यामुळे आतापर्यंत सोने सर्वाधिक परतावा देते, असा समज या आकड्यांनी खोडून काढला आहे. भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 21.9 कोटी बाटल्या आयात केल्या. तर फ्रान्सने इंग्लंडमधून स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 20.5 कोटी बाटल्या आयात केल्या.

सोन्यातील परतावा हा केवळ दोन आकडी आहे, तर व्हिस्कीचा परतावा तीन आकडी आहे. रेअर व्हिस्कीने आतापर्यंत 373 टक्के परतावा दिला आहे. न पिताच होश उडाले की नाही! नाईट फ्रेंक लग्झरी इन्व्हेस्टमेंट इंडेक्सनुसार (Knight Frank Luxury Investment Index) गेल्या ऑक्टोबरमध्ये सॉद्बीने (Sotheby) The Macallan या व्हिस्कीची 81 वर्षांपूर्वीची सिंगल मॉल्ट व्हिस्कीची बाटली 300,000 पौंडमध्ये विक्री केली. इतकेच नाही तर वाईनवर सरासरी 162 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलिशान कार आहेत. आलिशान कार्सने या दहा वर्षांत 185 टक्के परतावा दिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर वाईनमधून 162 टक्के परतावा मिळाला आहे. जर तुम्ही महागड्या घड्याळांमध्ये गुंतवणूकक केली असेल तर गेल्या वर्षी सरासरी 147 टक्के परतावा मिळाला आहे. आर्ट प्रकारात गुंतवणूक करणाऱ्यांना याच कालावधीत 91 टक्के परतावा मिळाला आहे. हँडबॅग्सवर 74 टक्के, कॉईन्सवर 59 टक्के तर दागिने, आभुषणांवर 44 टक्के परतावा मिळाला आहे. व्हिस्की, वाईन ही जेवढी जुनी तेवढा त्यावरील परतावा अधिक मिळतो.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही वर्षांपासून भारतीयांना पण महागड्या दारुचा शौक चढला आहे. गेल्या वर्षी जगभरात 6.2 अब्ज पौंडची व्हिस्की आयात करण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आयातीत 37 टक्के वृद्धी नोंदविण्यात आली. ब्रिटन हा व्हिस्कीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे. इंग्लंडने सर्वाधिक स्कॉच अमेरिकाला निर्यात केली आहे. स्कॉटलँडकडून अमेरिकेला 105.3 कोटी डॉलरची व्हिस्की पाठविण्यात आली आहे. तर भारताला 28.2 कोटी पौंडची व्हिस्की पाठविण्यात आली आहे.

भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 21.9 कोटी बाटल्या आयात केल्या. तर फ्रान्सने इंग्लंडमधून स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलिटरच्या 20.5 कोटी बाटल्या आयात केल्या. यामुळे रोजगार वाढल्याचा दावा इंग्लंडचे उद्योग आणि व्यापार मंत्री निगेल हडलस्टन यांनी केला आहे. निर्यातीचे आकडे मन प्रसन्न करणारे असल्याचे ते म्हणाले.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.