Investment advice : डयूरेशन फंड म्हणजे काय?, सध्या नक्की कोणत्या डयूरेशन फंडात गुंतवणूक करावी; जाणून घ्या एका क्लिकवर
ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड प्रकारात विविध प्रकारच्या फंडाचा समावेश होतो . हे म्युच्युअल फंड अशा साधनांमध्ये गुंतवणूक करतात जिथे कर्जाची खरेदी विक्री होते.
कोणत्या म्युच्युअल फंडात (Mutual funds) किती कालावधीसाठी पैसे गुंतवाववेत (Investment) यावरून सुहानी नेहमी चिंतेत असायची. त्यातच तिच्या आर्थिक सल्लागाराने डयूरेशन फंडाबद्दल माहिती दिली. आता हे काय नवीन? असा तिला प्रश्न पडला. एम्फीनुसार ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड प्रकारात विविध प्रकारचे फंड असतात. उदाहरणार्थ लॉंग डयूरेशन फंड, मिडियम डयूरेशन फंड, शॉर्ट डयूरेशन फंड, मीडियम टु लॉन्ग ड्यूरेशन फंड, लो ड्यूरेशन फंड यांसारखे अनेक फंड, डयूरेशन डेट म्युच्युअल फंडात येतात. हे म्युच्युअल फंड अशा साधनांमध्ये गुंतवणूक करतात जिथे कर्जाची खरेदी विक्री होते. त्यामुळे रिटर्नसाठी (Returns) गुंतवणुकीचा कालावधी महत्वाचा असतो. सुहानीसारख्या नवीन गुंतवणूकदारांसाठी मीडियम डयूरेशन फंडात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल की लॉंग डयूरेशन फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल तर सर्वात आधी जाणून घेऊया लॉंग डयूरेशन फंडाबाबत
लॉंग डयूरेशन
लॉंग डयूरेशन फंडाला लॉंग टर्म बॉन्ड फंड देखील म्हणतात. हे असे डेट फंड असतात ज्यामध्ये जास्त काळासाठी फिक्स सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करतात. सेबीनुसार लॉंग डयूरेशन फंड्सन तीन ते सात वर्षापर्यंत डेट किंवा मनी मार्केटमधील साधनांमध्ये गुंतवणूक करतात.
मीडियम ड्यूरेशन म्युच्युअल फंड
मीडियम डयूरेशन फंड हे ओपन एंडेड डेट फंड असतात. मीडियम ड्यूरेशन फंड अशा डेट साधनांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांची मुदत तीन ते चार वर्षांची असते. तज्ज्ञांच्या मते व्याजदरांमध्ये घट होत असताना मीडियम ड्युरेश फंडाच्या माध्यमातून दोन अंकी रिटर्नची अपेक्षा ठेवता येते. व्याजदर वाढल्यानंतर या फंडांचे प्रदर्शन फारसं चांगलं नसते. त्यामुळे रिटर्न 10 टक्क्यांपेक्षा कमी मिळू शकतो.
सध्या कोणता फंड चांगला ?
सध्या अर्थव्यवस्थेत प्रचंड अस्थिरता आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांत व्याजदर वाढू शकतात. सहसा लॉंग डयूरेशन फंड आणि मिडियम डयूरेशन फंड कमी व्याजदर असताना चांगली कामगिरी करतात. मात्र, सध्या व्याज दर वाढत असल्यानं गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक करावी. महागाई वाढत राहिल्यामुळे पुढे व्याजदर देखील वाढू शकतात. अशामध्ये लॉंग डयूरेशन फंड आणि मीडियम डयूरेशन फंडची कामगिरी खराब होते. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी असणारे शॉर्ट टर्म डयूरेशन फंड किंवा बँकिंग- PSU फंडात गुंतवणूक करावी. असे ट्रस्ट म्युच्युअल फंडचे CEO संदीप बागला यांच मत आहे. येणाऱ्या काळात व्याजदर वाढू शकतात. त्यामुळे शॉर्ट टर्म डयूरेशन फंडात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. पण डेट फंडात गुंतवणूक करताना आपल्या लक्ष्यानुसार असावी. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डेट फंड आहेत . या प्रत्येक फंडात विविध प्रकारचा क्रेडिट आणि इंटरेस्ट रिस्क असते. म्हणजेच या रिस्कच्या कॉम्बिनेशनवर देखील लक्ष दिले पाहिजे.