Gold Silver Return : चांदीतून 30 टक्क्यांची कमाई, सोन्यातून ही मिळवा जोरदार परतावा, आताच गुंतवणुकीची योजना आखा

Gold Silver Return : सोने-चांदीचे भाव वाढत असताना त्यातून कमाईची संधीही होईल.

Gold Silver Return : चांदीतून 30 टक्क्यांची कमाई, सोन्यातून ही मिळवा जोरदार परतावा, आताच गुंतवणुकीची योजना आखा
कमाईची संधी
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षांत गुंतवणुकीचा संकल्प (New Year Investment Plan) करत असाल तर सोन्या-चांदीतील गुंतवणूक (Gold-Silver Investment) फायदेशीर ठरु शकते. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव (Gold-Silver Rate) सूसाट आहे. सोन्याने तर नवीन रेकॉर्ड केला आहे. चांदीही लवकरच नवीन उच्चांक गाठेल. त्यामुळे सोन्या-चांदीतील गुंतवणूक तुम्हाला येत्या काही दिवसांत मालामाल करेल. शेअर बाजारात सातत्याने चढउतार होत आहे. तर इतर योजनांमधूनही लागलीच जोरदार परतावा (Better Return) मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी सोने-चांदीतील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. पण त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी जगातील अनेक देशांना महागाईने (Inflation) अक्षरशः पिळून काढले आहे. महागाईने गेल्या 40 वर्षांतील सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांतील केंद्रीय बँकांनी व्याज दरात (Interest Rates) वाढ केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनेही व्याजदरात सातत्याने वाढ केली. फेब्रुवारी महिन्यातही व्याज दर वाढीचे संकेत मिळत आहेत. अर्थात यामुळे मंदीची चर्चा (Recession Fears) सुरु आहे. या घडामोडींचा परिणाम अर्थातच सोन्या-चांदीच्या किंमतींवर (Gold-Silver Prices) होत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

हे सुद्धा वाचा

तज्त्रांच्या मते, यंदा सोन्या-चांदीचे दर जोरदार उसळी घेतील. गुंतवणूकदारांना खरा फायदा चांदीतील गुंतवणुकीतून मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. केडिया फर्मच्या सल्ल्यानुसार, या वर्षात चांदी 30 टक्के परतावा (Returns From Silver) मिळवून देईल. सोन्यातील गुंतवणूक यंदा 14 टक्के रिटर्न मिळवून देईल. दोन्ही मौल्यवान धातूत केलेली गुंतवणूक कमाईची संधी मिळवून देतील.

केडिया अॅडवायजरीचे एमडी अजय केडिया यांनी दावा केला आहे की, यंदा चांदीत 30 टक्क्यांचा बंपर परतावा मिळेल. या वर्षी 2023 मध्ये चांदीच्या किंमती 90,000 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या चांदीचा भाव 72000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

त्यामुळे मल्टि कमोडिटी मार्केटमध्ये, सराफा बाजारात गुंतवणूक करता येईल. तुम्हाला आता ऑनलाईन गुंतवणुकीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी न करता थेट त्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच पुढे गरज वाटल्यास गुंतवणुकीचे रुपांतर फिजिकल गोल्डमध्येही करता येते.

Non Stop LIVE Update
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.