Paper Gold : हे पेपर गोल्ड आहे तरी काय? धनत्रोयदशीला ग्राहकांची खरेदीसाठी का उडाली झुंबड

Dhanteras 2024 Gold Investment : दिवाळी आली की अनेकांची गुंतवणुकीची योजना बाहेर येते. पण नेमकं कुठं गुंतवणूक करावी हा प्रश्न बाकी असतोच. आता पेपर गोल्डच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यासाठी आर्थिक तरतूद करता येते. याशिवाय डिजिटल गोल्ड, सॉव्हेरन गोल्ड बाँड, ईटीएफचे पर्याय समोर आहेतच.

Paper Gold : हे पेपर गोल्ड आहे तरी काय? धनत्रोयदशीला ग्राहकांची खरेदीसाठी का उडाली झुंबड
सोन्यात गुंतवणुकीचा डिजिटल पर्याय
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 9:56 AM

धनत्रोयदशीला अनेकांना गुंतवणुकीची आठवण येते. अनेक जण त्यासाठी खास योजना आखतात. सोने आजही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे मानण्यात येते. सध्या डिजिटल गोल्ड सुद्धा अच्छे दिन आले आहेत. या डिजिटल गोल्डला पेपर गोल्ड असे सुद्धा मानण्यात येते. ज्यांच्याकडे घरी सोने सुरक्षित राहू शकत नाही अथवा ज्यांना डिजिटल गोल्डमध्येच गुंतवणुकीचा (Gold Investment) पर्याय हवा असतो, त्यांच्यासाठी पेपर गोल्ड हा एकदम जबरदस्त पर्याय आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांकडे काय काय पर्याय आहेत. तर डिजिटल गोल्डमध्ये ग्राहकांसमोर सॉव्हेरिन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड यासारखे अनेक पर्याय आहेत.

गोल्ड ETF मध्ये करू शकतात गुंतवणूक

गोल्ड ईटीएफ सारखे फंड तुम्हाला मालामाल करू शकतात. नियमित शेअर अथवा स्टॉक एक्सचेंजवर तुम्ही व्यापार करू शकतात. गोल्ड ETF खरेदीसाठी तुमच्याकडे डीमॅट खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या निप्पॉन इंडिया गोल्ड ETF, HDFC गोल्ड ETF वा ICICI प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ सारखे लोकप्रिय गोल्ड ईटीएफ बाजारात आहेत. तुम्ही स्वतः ऑनलाईन सर्च करून अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करू शकता.

हे सुद्धा वाचा

सॉव्हेरिन गोल्ड बाँडचा पर्याय

सॉव्हेरिन गोल्ड बाँड योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होता. हे सुवर्ण रोखे केंद्रीय रिझर्व्ह बँक बाजारात आणते. त्याची केंद्र सरकार हमी घेते. या गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. या योजनेत वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. हा पैसा प्रत्येक 6 महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होतो. एसजीबीचा पहिला हप्ता 30 नोव्हेंबर, 2015 रोजी आला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचा आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला होता. आयकर सवलतीसह यावर 2.5% निश्चित परतावा मिळतो.

गोल्ड म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक

गोल्ड म्युच्युअल फंडात विशेषतः गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. सोन्यात गुंतवणुकीचा हा एक अप्रत्यक्ष पर्याय आहे. एचडीएफसी गोल्ड फंड वा एसबीआय गोल्ड फंड सारखे गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही थेट ऑनलाईन याविषयी सर्च करू शकता.

डिजिटल सोने

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर डिजिटल सोन्याचा पर्याय उपलब्ध आहे. अगदी 100 रुपयांपासून या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. याठिकाणी ग्राहकांना आवडीनुसार खरेदी-विक्री करण्याची सोय आहे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येऊ शकते.

असा होतो फायदा

प्रत्यक्ष सोने खरेदी करताना आपल्याला त्यावर कर चुकता करावा लागतो. परंतु डिजिटल गोल्ड खरेदीवर जीएसटी आकारण्यात येत नाही. अजूनतरी गोल्ड इन सिक्युरिटीवर जीएसटी लावण्याचा नियम नाही. सध्या ग्राहकांना जवळपास 3 टक्क्यांचा थेट फायदा होत आहे.

डिजिटल गोल्ड जवळ बाळगण्याची गरज नाही. ते हरवण्याची भीती नाही. तसेच ते लॉकरमध्ये ठेऊन, त्यापोटी बँकेला पैसे मोजण्याची गरज नाही. चोरी होण्याची भीती नाही, हा एक मोठा फायदा आहे.

डिजिटल गोल्ड केव्हा पण खरेदी आणि विक्री करता येते. तर फिजिकल गोल्ड विक्रीसाठी तुम्हाला सराफा पेढीवर, दुकानावर जावे लागते. दुकानदार सोने कमी किंमतीवर खरेदी करतो.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.