21 व्या वर्षी तुमच्या मुलांकडे असतील 2 कोटी , फक्त असं करा प्लानिंग !
जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर ही गुंतवणूक योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जितक्या लवकर तुम्ही हे सुरू कराल तितके तुमच्या मुलांच्या भवितव्याचे टेन्शन कमी होईल.
Savings Tips : मुलांच्या भविष्याची चिंता कोणाला नसते ? आपण जी मेहनत करतो, पैसे कमावते ती आपल्यासाठी आणि मुलाबाळांसाठीच तर असते. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नाच्या खर्चांपर्यंत अनेक गोष्टींसाठी तुम्हाला आर्थिक नियोजन खूप आधीपासून सुरू करावे लागेल. अन्यथा नंतर काळजी करत बसावे लागते., ज्यामुळे तुमची मुलगी किंवा मुलगा 21 वर्षांचे झाल्यावर ते 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मालक बनू शकतील, अशा एखाद्या तुम्हाला अशा एखाद्या गुंतवणूक योजनेबद्दल सांगण्यात आले तर ?
जर तुम्ही नवविवाहित जोडपे असाल किंवा नुकतेच पालक झाले असाल. मग तुम्ही ही गुंतवणूक योजना मुलाच्या जन्मापासूनच सुरू करू शकता. 21 वर्षात तुम्हाला इतका परतावा मिळेल की मुलांकडे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. चला हा हिशोब समजून घेऊ
दरमहा फक्त 10,000 रुपये करा सेव्ह
तुमच्या मुलाकडे किंवा मुलीकडे वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. याद्वारे तुम्ही 21 वर्षात मुलांच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा करू शकाल. आता आपण असे गृहीत धरू की SIP वर तुम्हाला 16 टक्के दराने परतावा मिळेल. त्यामुळे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे 2.06 कोटी रुपये असतील.
मुलांच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील. मुलाचे वय 21 वर्षे झाल्यानंतर, ही रक्कम मुलाचे शिक्षण, लग्न किंवा व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते.
जर फक्त 12% व्याज मिळाले तर..
आपण असे गृहीत धरू की तुम्हाला SIP मध्ये 16% व्याज मिळाले नाही आणि फक्त 12% व्याज मिळाले, तरीही तुम्हाला तुमच्या या गुंतवणुकीमुळे पश्चात्ताप करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळेल. त्याच्याकडे एकूण १.१३ कोटी रुपये असतील.
( डिस्क्लेमर : ही केवळ माहिती आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांकडून अथवा सल्लागाराकडून अवश्य सल्ला घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसान झाले तरी त्यासाठी TV9 मराठी जबाबदार नसेल.)