रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?

फक्त 50 ते 100 रुपयांच्या गुंणतवणुकीवर तुम्हाला बक्कळ नफा देणारी एक योजना समोर आली आहे. खरंतर, गुंतवणीकीसाठी मोठी रक्कम आवश्यक असते. पण आता कमी पैशात तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 10:54 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सगळ्यांवरच आर्थिक अडचण ओढावली आहे. या सगळ्यात पैशांची बचत करणं अवघड झालं आहे. पण फक्त 50 ते 100 रुपयांच्या गुंणतवणुकीवर तुम्हाला बक्कळ नफा देणारी एक योजना समोर आली आहे. खरंतर, गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम आवश्यक असते. पण आता कमी पैशात तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. आता छोटी गुंतवणूक करून तुम्ही मोठा फंड जमा करू शकता. यासाठी योग्य ठिकाणी पैसा लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी सगळ्यात उत्तम योजना आहे ती सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF​). या योजनेमध्ये फक्त 200 रुपयांची गुंतवणूक करत 20 वर्षांमध्ये तुम्ही 14 लाख रुपयांचे मालक होऊ शकता. (investment scheme daily invest 200 rupee PPF and get 14 lakh rupee in 20 years money)

PPF चे फायदे PPF योजनेअंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर सुरक्षा हमी मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योनजेत मिळणाऱ्या व्याजावर इनकम टॅक्स लागू होत नाही. यामध्ये नॉमिनीचीदेखील सुविधा आहे. या गुंतवणुकीसाठीचं अकाऊंट हे पोस्ट ऑफिस आणि बँकांनी निवडलेल्या शाखांमध्ये 15 वर्षांसाठी उघडलं जातं, जे पुढे 5 वर्षांसाठी वाढवलं जाऊ शकतं.

अवघ्या 500 रुपयांत उघडू शकता अकाऊंट फक्त 500 रुपयांमध्ये बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट उघडता येऊ शकतं. पण यासाठी आर्थिक वर्षात कमीत-कमी 500 रुपये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. एका वर्षात किमान 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. या खात्यातील व्याज दर वेळोवेळी सरकार ठरवतं. एप्रिल ते जून या तिमाहीत खात्यात 7.1 टक्के व्याज मिळतं.

असा उभा करता येईल 32 लाखांचा फंड या योजनेअंतर्गत जर तुम्ही 200 रुपयांची रोज बचत करण्याचा विचार केला तर महिन्याचे 6000 रुपये होतील. अशा पद्धतीने तुमची वर्षाची गुंतवणूक 72,000 रुपये होईल. जर तुम्ही हे 15 वर्षांपर्यंत सुरू ठेवलं तर तुमची एकूण गुंतवणूक 10,80,000 होईल. PPF मध्ये वर्षाला चक्रवाढच्या (कंपाऊंडिंग) रुपात 7.1 टक्के व्याज मिळतं. 20 वर्षांपर्यंत जर याच दरात व्याज मिळालं तर एकूण परतावा 14.40 लाख रुपयांचा होईल. म्हणजे यापाठी एकूण 17.55 लाख रुपये व्याजाच्या रुपात तुमच्या हातात असतील. (investment scheme daily invest 200 rupee PPF and get 14 lakh rupee in 20 years money)

काय आहे कंपाऊंडिंगचा फॉर्मूला? A=P (1+r/n)nt A: एकूण प्रधान रक्कम P: प्रधान रक्कम r: व्याज दर n: एका वर्षात किती वेळा कंपाऊंडिंग होतं nt: एकूण कालावधी

टीप: गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या.

इतर बातम्या – 

विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुशखबर, एअर इंडियाकडून तिकिट दरात मोठी सूट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.