शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदार दमदार पेनी शेअर शोधतात. कारण आज ज्या नामचिन कंपन्या आहेत. त्यांचे शेअर कधीकाळी आजच्या मानाने स्वस्त होते. ज्यांनी त्यावेळी गुंतवणूक केली. ते आज मालामाल झाले आहेत. पेनी स्टॉक कमी किंमतीत मिळतो आणि भविष्यात मोठा रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. योग्य पेनी स्टॉक मिळाल्यास या संधीचे मोठं सोनं होतं. या 7 रुपयांच्या स्टॉकने अशीच कमाल कामगिरी करुन दाखवली आहे. तो वधारुन आता 55 रुपयांपर्यंत पोहचला आहे.
5 महिन्यात जबरदस्त रिटर्न
1 वर्षापूर्वी 53 रुपये भाव
दुसरी एक कंपनी जय बालाजी कंपनीचा शेअर 25 एप्रिल 2023 रोजी 53.03 रुपये प्रति शेअर असा होता. आता हा शेअर 1,085 रुपयांवर पोहचला होता. तो आता घसरुन 967 रुपयांवर आला आहे. एका वर्षाचा विचार करता या शेअरने 1084 टक्क्यांचा परतावा दिला आहे.गेल्या महिनाभरात या शेअरने 16.89 टक्क्यांचा परतावा दिला. याशिवाय सहा महिन्यात या शेअरने 87.21 टक्क्यांची चढाई केली. एका वर्षात कंपनीचे मार्केट कॅप 771.32 कोटी रुपयांहून 18,744.48 कोटी रुपयांवर पोहचले.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.