Muhurat Trading मधून आतापर्यंत किती कमाई; गुंतवणूकदारांची ऐन दिवाळीत झाली की दिवाळी
Muhurat Trading Income : 2023 मध्ये 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करण्यात आली होती. गेल्या वेळच्या दिवाळीत मागील 5 वर्षांतील सर्व विक्रम इतिहास जमा झाले होते. या व्यापारी सत्रात शेअर बाजाराने जोरदार परतावा दिला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज निर्देशांकाने 0.55 टक्क्यांसह 65,259 अंकावर तर निफ्टी 50 0.52 टक्के वाढीसह 19,525 अंकावर बंद झाला होता.
प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात एक तासांचे खास व्यापारी सत्र होते. त्यालाच मुहूर्त ट्रेडिंग सत्र (Muhurat Trading Session) असे म्हणतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा सत्र होते. या दिवशी केलेली गुंतवणूक ही शुभ मानण्यात येते. गुंतवणूकदार या दिवशीची कमाई ही वर्षभरासाठीची लकी असल्याचा दावा करतात. यंदा बीएसई आणि एनएसईवर शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 वाजेपासून ते 7:00 वाजेपर्यंत मुहूर्त व्यापारी सत्र होणार आहे. तर दिवसभर बाजार बंद असेल.
आता या दिवाशी फायदा होतो की नाही असा अनेकांच्या मनात प्रश्न असेल. जर मागील आकडेवारीवर नजर टाकली तर मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रात गुंतवणूकदारांची कमाई झाल्याचे दिसून येते. अर्थात त्यांना एकदम मोठा फायदा झाला नसला तरी गेल्या 16 वर्षांतील 13 मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स हिरव्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार उतरंडीला लागला आहे. त्यात सातत्याने पडझड होत असल्याने गुंतणूकदार मुहूर्त ट्रेडिंगविषयी सुद्धा साशंक आहेत.
गेल्यावर्षी कसा होता मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स
गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करण्यात आली होती. गेल्या वेळच्या दिवाळीत मागील 5 वर्षांतील सर्व विक्रम इतिहास जमा झाले होते. या व्यापारी सत्रात शेअर बाजाराने जोरदार परतावा दिला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज निर्देशांकाने 0.55 टक्क्यांसह 65,259 अंकावर तर निफ्टी 50 0.52 टक्के वाढीसह 19,525 अंकावर बंद झाला होता. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सनी जोरदार कामगिरी बजावली होती. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.67 टक्क्यांनी वधारला होता. तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 1.14 टक्के चढला. तर सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून 322.5 लाख कोटी रुपये झाले होते.
गेल्या दीड दशकात असा झाला गुंतवणूकदारांना फायदा
गेल्या काही वर्षात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. निर्देशांक 2022 मध्ये जवळपास 1 टक्के, 2021 मध्ये 0.5 टक्के, 2020 मध्ये 0.47 टक्के आणि 2019 मध्ये 0.37 टक्के वाढला. तर 2018 मध्ये 0.7 टक्के वृद्धी दिसून आली. त्यानंतर थोडी घसरण झाली. 2017 मध्ये 0.6 टक्के, 2016 मध्ये 0.04 टक्के आणि 2012 मध्ये 0.3 टक्के घसरण दिसून आली. सर्वात जास्त फायदा मुहूर्त ट्रेडिंग सेशन 28 ऑक्टोबर, 2008 मध्ये झाला होता. त्यावेळी शेअर बाजार 6 टक्क्यांनी वधारला होता. त्यावेळी मंदीची लाट होती. तरीही बाजाराने चमकदार कामगिरी दाखवली होती.