Indian Share Market : अवघ्या चार दिवसांत 700000 कोटी स्वाहा! भारताला मागे सरत इंग्लडची आघाडी

Indian Share Market : अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्याचा फटका भारतीय इक्विटी मार्केटला बसला. 9 महिन्यात पहिल्यांदा इंग्लंडने भारताला मागे ढकलले आहे. बुधवारी भारतीय बाजारात सातत्याने चौथ्या दिनी घसरण दिसून आली. 24 जानेवारी रोजीपासून अदानी समूहाचे मार्केट कॅप 142 अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

Indian Share Market : अवघ्या चार दिवसांत 700000 कोटी स्वाहा! भारताला मागे सरत इंग्लडची आघाडी
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरु आहे. बुधवारी बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. त्याचा भारताच्या इक्विटी बाजारावर परिणाम दिसून आला. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, इंग्लंडने (England) भारताला मागे ढकलले आहे आणि जगातील सहावा सर्वात मोठा इक्विटी बाजार (Equity Market) ठरला आहे. 9 महिन्यात पहिल्यांदा इंग्लंडने भारताला धोबीपछाड दिली आहे. इंग्लंडची प्रायमरी लिस्टिंग्सचे एकूण मार्केट कॅप मंगळवारी 3.11 ट्रिलियन डॉलरवर पोहचले. हे मार्केट कॅप भारताच्या तुलनेत 5.1 डॉलर अधिक आहे. 29 मे 2022 नंतर पहिल्यांदा इंग्लंडचा इक्विटी बाजार भारताच्या पुढे गेला आहे. पाऊंड घसरल्याने गुंतवणूकदार इंग्लंडच्या बाजाराकडे वळले आहेत. भारतीय बाजारातही घसरणीचे सत्र सुरु असून बुधवारी बीएसई निर्देशांक 900 अंकानी कोसळला. चार दिवसांत गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी रुपये गमावले.

गेल्या चार दिवसांत निर्देशकांत 1,500 अंकांची घसरण दिसून आली. बुधवारी ही घसरणीची लाट आली. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.9 लाख कोटी रुपयांनी घसरुन 261.3 लाख कोटी रुपये राहिले. यावर्षी MSCI India Index मध्ये 6.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी समूहाच्या शेअरमध्ये 24 जानेवारीपासून सातत्याने घसरण सुरु आहे. यामुळे या समूहाचे बाजारातील भांडवल 142 अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

बीएसई इंडेक्स 1 डिसेंबरपासून 10 टक्के घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, अदानी समूहावरील आरोपामुळे या ग्रुपचे सर्वच शेअर गडगडले आहेत. त्यांनी लाल निशाण फडकावले आहे. या पडझडीमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही धास्तावले आहेत. त्यांची भारतीय बाजाराविषयी जर नकारात्मक भावना झाली तर मात्र भारतीय शेअर बाजारालाही मोठा धक्का बसू शकतो. परंतु तज्ज्ञांच्या मते याचा फटका केवळ अदानी समूहालाच बसू शकतो. दुसऱ्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची संख्या कमी होणार नाही.

हे सुद्धा वाचा

अदानींची प्रमुख कंपनी अदानी इंटरप्राईजेस 7 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. अदानी पॉवर सकाळी चार टक्क्यांनी वधारला आणि पुन्हा गडगडला. अदानी गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, एसीसी, एनडीटीव्ही आणि अंबुजा सिमेंट या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गुंतवणूकदार या शेअरची विक्री करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बोक्ररेज फर्मनुसार, इंग्लंडचा शेअर बाजार गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. इंग्लंडचा FTSE 350 Index यावर्षी 5.9 टक्के वाढला आहे. ब्लू चिप FTSE 100 ने गेल्या आठवड्यात 8,000 अंकांचा टप्पा पार केला आहे. पाऊंडची किंमत सातत्याने घसरत असल्याने परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात इंग्लंडच्या बाजारात पैसा ओतत आहेत.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.