Share Big Return : दौडा दौडा भाग भागसा! FD पेक्षा जास्त रिटर्न एकाच दिवसात, हा शेअर तरी कोणता

Share Big Return : या शेअरने एकाच दिवसात एफडी इतका परतावा देण्याचा विक्रम केला आहे. या शेअरने कमालीचा रिटर्न दिला आहे.

Share Big Return : दौडा दौडा भाग भागसा! FD पेक्षा जास्त रिटर्न एकाच दिवसात, हा शेअर तरी कोणता
काय पळाला हा गबरु
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 6:14 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) प्रत्येक स्टॉक काही ना काही कमला करतोच. त्याची चर्चा होते. त्याचा सरळ फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. चांगली बातमी असेल तर त्या शेअरचा भाव तेजीत येतो. हा शेअर कमाल दाखवितो. गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळतो. शेअर बाजारातील एका कंपनीचा शेअर असाच सूसाट धावला. या शेअरने एकाच दिवसात एफडी (Fixed Deposit) इतका परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे वारे न्यारे झाले. इन्ट्रा डे मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

रेल्वेने दिली मोठी ऑर्डर तर या कंपनीचे नाव रामकृष्णा फॉजिंग्स लिमिटेड (Ramkrishna Forgings Share) असे आहे. या कंपनीला रेल्वे मंत्रालयाने ट्रेनसाठी चाक तयार करण्याची ऑर्डर दिली. हा बातमी वाऱ्यासारखी बाजारात पसरली आणि या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. हा शेअर तुफान पळाला. गुरुवारी या शेअरने, बाजारात 10 टक्के उसळी घेतली. गुंतवणूकदार मालामाल झाले.

आत्मनिर्भर भारत योजना आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत रामकृष्ण फोर्जिंग्स आणि टाटागढ वॅगन्स या दोन कंपन्यांना ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. योजनेतंर्गत चाक तयार करणे आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही ऑर्डर दिली आहे. हे वृत्त बाजारात धडकताच या शेअरमध्ये तुफान आले. गुरुवारी इंट्रा डेमध्ये या शेअरची किंमत 10 टक्के घसरली.

हे सुद्धा वाचा

12,227 कोटींची मिळाली ऑर्डर रेल्वे मंत्रालयाने या कंपन्यांना 12,227 कोटींची ऑर्डर दिली आहे. त्यातंर्गत या कंपनीला 20 वर्षांच्या कालावधीत 15,40,000 रेल्वेच्या चाकांची निर्मिती करुन पुरवठा करावा लागणार आहे. या वृत्तामुळे टीटागढ वॅगन्सच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर रामकृष्ण फोर्जिंगच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची तेजी दिसून आली. बाजार बंद झाल्यावर हा शेअर 8 टक्क्यांनी वधारुन 305.45 रुपयांवर पोहचला. या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला.

या कंपन्यांना पुरवठा रामकृष्णा फोर्जिंग्स लिमिटेड ही ऑटो एंसियेलरीज क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 1981 मध्ये झाली आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4871.83 कोटी रुपये आहे. रामकृष्ण फोर्जिंग्स देशात Tata Motors, Ashok Leyland, VE Commercial, Daimler, Volvo, Mack Trucks, Iveco, DAF, स्कैनिया, MAN, UD ट्रक्स आणि Ford Otosan या कंपन्यांना पुरवठा करते.

आतापर्यंत परदेशातून येत होते चाक 1960 पासून भारतीय रेल्वे ब्रिटेन, चेक गणराज्य, ब्राझिल, रोमानिया, जपान, चीन, युक्रेन आणि रुस येथील कारखान्यातून रेल्वेच्या चाकांची आणि इतर साहित्यांची आयात करत होता. 2022-23 मध्ये चीन आणि रशियाने जवळपास 520 कोटी रुपयांच्या 80,000 चाकांची आयात केली होती.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.