पहिल्याच दिवशी ‘या’ कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद

मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीच्या IPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. Mrs. Bectors Food Specialities IPO

पहिल्याच दिवशी 'या' कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 12:18 PM

मुंबई : बिस्किट बनवणारी कंपनी मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीच्या IPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. स्टॉक एक्सचेंजच्या माहितीनुसार IPO ची ऑफर साईज 1.32 कोटी शेअर्सच्या तुलनेत 4.9 कोटी शेअर्सवर बोली लागली. पहिल्याच दिवशी IPO चे शेअर्स 3.7 पट सबस्क्राईब झाले. (Investors rushed to invest in Mrs. Bectors Food Specialities IPO on first day)

क्रैमिका (Creamica) नावानं बिस्किट बनवणारी कंपनी मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीच्या आयपीओमध्ये 17 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. बर्गर किंगला ही कंपनी कच्चा माल पुरवठा करण्याचं काम करते. आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार 15 ते 17 डिसेंबरदरम्यान गुंतवणूक करु शकतात.

पहिल्याच दिवशी रिटेल गुंतवणूकदारांनी 6.8 टक्के शेअर्स खरेदी केले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या कोट्यापैकी 9.5 टक्के गुंतवणूक झाली आहे. क्वालिफाईड इनस्टिट्यूशनल बायर्सने (QIB) 1.1 टक्के शेअर्स खरेदी केली आहे. मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीचे IPO द्वारे 540 कोटी उभारण्याचे लक्ष्य आहे. आयपीओचे प्राइस बँड मूल्य 286-288 रुपये निश्चित करण्यात आले आहे, गुंतवणूकदार कमीत कमी 50 शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकतील. कंपनीनं अँकर इन्वेस्टर्सद्वारे झालेल्या गुंतवणुकीतून 162 कोटी उभारले आहेत. (Investors rushed to invest in Mrs. Bectors Food Specialities IPO on first day)

ऑफर फॉर सेलअंतर्गत 500 कोटींचे शेअर

मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीच्या आयपीओकडून 40.54 कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर जारी करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत 500 कोटी रुपयांचे शेअर आणले जातील. आयपीओचे 50 टक्के शेअर्स क्वालिफायड इनस्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर, रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेअर्सच्या किमतीत 15 टक्के सूट मिळणार आहे. त्यांच्यासाठी 50 लाख रुपये किमतीचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. (Investors rushed to invest in Mrs. Bectors Food Specialities IPO on first day)

आयपीओमध्ये गुंतवणूक झालेल्या रकमेचा वापर राजपुरा येथील मन्युफॅक्चरिंग युनिटच्या विकासासाठी आणि नवीन प्रोडक्श्न प्लांटसाठी करण्यात येणार आहे. IPO साठी मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटी कंपनीने एसबीआई कैपिटल मार्केट्स, ICICI Securities आणि IIFL Securities को लीड मॅनेजर नियुक्त केले आहे. आयपीओला BSE आणि NSE मध्ये नोंदवले जाणार आहे.

मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटी कंपनी Cremica या बिस्किटची विक्री करते. यासोबत English Oven बँडखाली ब्रेड, कुकीज, क्रीम आणि डाइजेस्टिव बिस्किट बनवते. ही कंपनी मॅकडोनाल्ड्स, केएफसी, बर्गर किंग आणि कार्ल्स ज्युनियरसह अन्य कंपन्यांना कच्चा माल पुरवते. ही कंपनी भारतातील 26 राज्ये आणि 64 देशांमध्ये उत्पादनांची विक्री करते.

संबंधित बातम्या

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल…

शेअर बाजारात गुंतवणूक करायचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्या कामाची !

(Investors rushed to invest in Mrs. Bectors Food Specialities IPO on first day)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.