Sovereign Gold Bond : जोरदार परतावा! सरकारी गोल्ड बाँडने आणली की श्रीमंती
Sovereign Gold Bond : सोन्याच्या किंमती रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहेत. तर सरकारी सुवर्ण रोख्यातील गुंतवणुकीतूनही सर्वसामान्यांना मोठा परतावा मिळाला आहे. ही योजना कशी फायदेशीर ठरली, किती परतावा मिळाला, जाणून तर घ्या..
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजना दरवर्षी आणते. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्या सवलत मिळते. सध्या ग्राहकांना या योजनेत दोन दिवस मुदतपूर्व रक्कम काढण्याची संधी देण्यात आली आहे. 2017-18 मधील सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची ही तिसरी मालिका आहे. या मालिकेतून मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी 15 एप्रिल, 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण सोमवारपर्यंत ही प्रक्रिया करता येईल. गोल्ड बाँडचा कालावधी आठ वर्षांसाठी आहे. सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती.
104.55 टक्के परतावा सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत, बाँड जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी सुवर्ण रोख्यांची मुदतपूर्व बंद करता येते. त्यादिवशी व्याज मिळेल. त्यासाठी 15 एप्रिल ही दुसरी देय तारीख आहे. SGB 2017-18 च्या सॉव्हेरिन गोल्ड बाँडची सीरीज III चा मुदतपूर्व रिडेम्पशन रेट 6,063 रुपये प्रति युनिट आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँडची 2017-18 स्कीम सीरीज III ची इश्यू प्राइस 2,964 रुपये प्रति ग्रॅम होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मुदतपूर्व रक्कम काढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना एकूण 104.55 टक्के परतावा मिळेल.
भावाची निश्चिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) च्या अहवालानुसार, गेल्या तीन दिवसांच्या व्यापारी किंमतीनुसार, सोन्याची सरासरी किंमत काढण्यात येते. आरबीआयने प्रसिद्धी पत्रकानुसार, त्यानुसार, मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी हा दर निश्चित करण्यात आला आहे. 11, 12, आणि 13 एप्रिल, 2023 रोजीच्या सोन्याच्या बंद भावानुसार, रिडेम्पनशन प्राईस 6063 रुपये असेल.
कधी झाली सुरुवात सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्या सवलत मिळते.
ही आहे अट सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.
इतका परतावा या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.
इतके कोटी जमा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.