Mukesh Ambani : झाली की घोषणा! या तारखेला जिओ करेल शेअर बाजारात धमाका
Mukesh Ambani : जिओ फायनेन्शिअलचा शेअर लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. बीएसईने याविषयीची एक नोटीस पण काढली आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांना लवकरच लॉटरी लागणार आहे. ही कंपनी नुकतीच रिलायन्समधून विभक्त झाली आहे.
नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजमधून जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFSL ) नुकतीच विभक्त झाली. ही कंपनी आर्थिक क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे. तिने त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. गुंतवणूकदारांनी पण या कंपनीवर मोठा विश्वास दाखवला आहे. जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित झाली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना फटक्यात लॉटरी लागली आहे. आता ही कंपनी या दिवशी शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध होणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.
गुंतवणूकदारांना लॉटरी
रिलायन्सने गुंतवणूकदारांना अगोदरच लॉटरी लावली. रिलायन्सचे 1000 शेअर असतील तर गुंतवणूकदारांना JFSLचे 1000 शेअर मिळणार आहेत. आता एका शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित झाली आहे. म्हणजे एका झटक्यात गुंतवणूकदारांना 2,61,850 रुपयांचा फायदा होईल.
खात्यात शेअर जमा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर, जमा केल्याचे जाहीर केले. 10 ऑगस्ट रोजी हे शेअर डिमॅट खात्यात जमा करण्यात आले. आता हा शेअर बाजारात जिओ लवकरच सूचीबद्ध होईल. त्यानंतर ट्रेडिंग सेक्शन सुरु होईल.
कधी होणार सूचीबद्ध
बीएसईने याविषयची सूचना दिली आहे. त्यानुसार सोमवारी, 21 ऑगस्ट, 2023 रोजी फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडचा शेअर सूचीबद्ध होणार आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजला यापूर्वीच निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये स्थान मिळाले आहे. जोपर्यत शेअर बाजारात ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध होत नाही, तोपर्यंत शेअरच्या किंमतीत कुठलाच बदल होणार नाही. 21 ऑगस्ट नंतर हा बदल होईल.
कंपनीचे मूल्य सर्वाधिक
सध्या जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. त्यामुळे JFSL आता गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्या कोल इंडिया आणि इंडियन ऑईलपेक्षा पुढे आहे. तर रतन टाटा यांची टाटा स्टील पण या नवीन कंपनीने मागे टाकले आहे. भांडवलाच्या आधारे JFSL ही भारताची 32 वी मोठी कंपनी ठरली आहे.
जिओ धुमाकूळ घालणार
जगातील सर्वात मोठी ॲसेट कंपनी ब्लॅकरॉक इंकने (BlackRock Inc.) पुन्हा भारतात दाखल होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत तीने हात मिळवला आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज आणि ब्लॅकरॉकमध्ये 50:50 टक्के हिस्सेदारी असेल. जिओला ब्लॅकरॉकच्या गुंतवणूक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, उत्पादन, इतर विशेष सेवांचा लाभ मिळेल. त्यामुळे जिओ वित्तीय सेवांसह बाजारात धुमाकूळ घालणार आहे.