शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता.

शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा
शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:40 AM

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता. त्यामुळे प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणूक (Investment)करण्याची संधी मिळत होती. 2022 मधील तीन महिने संपले आहेत, तरीही आतापर्यंत फक्त चार कंपन्यांनीच आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एन्ट्री घेतलीये. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान 16 कंपन्यांचे आयपीओ आले. 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवल आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी उभारलं. म्हणजेच यावर्षी 75 टक्के आयपीओ कमी आले आहेत. तसेच भागभांडवल उभारणीत 57 टक्क्यानं घट होऊन 6707 कोटी झालीये. आयपीओ बाजारात एवढा दुष्काळ का आलाय ? बाजारातील जाणकार यामागे विविध कारणे सांगत आहेत. जाणून घेऊयात त्यामागील नेमकी कारणे काय आहेत ते.

आयपीओ दाखल न होण्याची कारणे

वाढते व्याजदर, कच्चे तेल आणि कमोडिटीची वाढती महागाई शेअर बाजारावर भारी पडताना दिसत आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. चीनमधील कोरोनाच्या लाटेमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झालीये.या विविध कारणांमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात कंपन्या लिस्टिंग करण्यासाठी उत्साह दाखवत नाहीयेत. एलआयसीच्या आयपीओलाही उशिर झाल्यानं आयपीओच्या बाजारात निरुत्साह आहे. जोपर्यंत LIC चा IPO येणार नाही तोपर्यंत दुसऱ्या कंपन्या उत्साह दाखवणार नाहीत असं सेबीनं मर्चंट बँकेला सांगितलं होतं.

कंपन्यांना संयमाचा सल्ला

आता आयपीओची तयारी करणाऱ्या कंपन्यांना इन्वेस्टमेंट बँकर्सनेही थोडा वेळ वाट पाहण्याचा सल्ला दिलाय. आयपीओच्या माध्यमातून 10 कंपन्या 9800 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारण्याच्या तयारीत होत्या. आता या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांनी आयपीओ स्थगित केलाय किंवा त्याचा आकार कमी केलाय. एकूणच जोपर्यंत जागतिक परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत आयपीओच्या बाजारात निरुत्साह कायम असणार आहे.

संबंधित बातम्या

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल

…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.