IRDAI ची स्टेट बँकेच्या ‘या’ कंपनीवर कारवाई, लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार, नेमकं कारण काय?

आयआरडीएआयनं एसबीआय जनरल इन्शुरन्सला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. IRDAI SBI General Insurance company

IRDAI ची स्टेट बँकेच्या 'या' कंपनीवर कारवाई, लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार, नेमकं कारण काय?
केवळ मिस कॉल द्या आणि मिळवा एसबीआयचे कर्ज
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 10:44 AM

नवी दिल्ली: विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आयआरडीएआयनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय जनरल इन्शुरन्सवर मोठी कारवाई केली आहे. आयआरडीएआयनं एसबीआय जनरल इन्शुरन्सला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सनं विमा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयआरडीएआयने एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला 2018-19 मधील एका प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे. (IRDAI imposed fine of 30 lakh on SBI General Insurance company for violating MTP Rules)

एसबीआय जनरल इन्शुरन्सला दंड का करण्यात आला?

आयआरडीएआयनं एसबीआय जनरल इन्शुरन्सला 2018-19 मधील वाहन विमा नियमांमधील नियमांचं उल्लंघन केल्यानं 30 लाखांचा दंड ठोठावला. एसबीआय जनरल इन्शुरन्सवर मोटार वाहन विम्यातील थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये अटींचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

आयआरडीएआयचे आक्षेप काय?

आयआरडीएआयनं एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीनं 2018-19 मध्ये एमटीपी नियमांचं पालन केलं नाही असा ठपका ठेवला. 2018-19 मध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीनं 321.98 कोटी रुपये म्हणजे 50.44 टक्के कमी रक्कमेचा एमटीपी केल्यानं त्यांना 30 लाखांचा दंड केला आहे. यापूर्वीच्या दोन वर्षांमध्येही या कंपनीकडून एमटीपी नियमांचं पालन केलं गेलं नाही, असं आयआरडीएआयनं म्हटलं आहे.

विम्याचे प्रीमियम वाढले

विमा क्षेत्रातील ज्या कंपन्या जीवन विमा सोडून इतर विमा योजना देतात त्यांच्या योजनांच्या प्रीमियमची रक्कम वाढली आहे. आयआरडीएआयच्या माहितीनुसार एप्रिल 2021 मध्ये एकूण 15 हजार 946.46 कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांकडे जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

संबंधित बातम्या:

SBI, Axis, IDFC, Kotak Bank कुठे मिळतोय एफडीवर सर्वाधिक फायदा, पटापट तपासा

एचडीएफसी बँक देशातील प्रत्येक गावागावात पोहोचणार, पण कसे ते जाणून घ्या…

HDFC बँकेला RBI ने दिला मोठा झटका, या प्रकरणात लावला 10 लाखांचा दंड

(IRDAI imposed fine of 30 lakh on SBI General Insurance company for violating MTP Rules)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.