मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : इस्राइल-हमास युद्धादरम्यान एअर इंडीयाने ( Air India ) मोठी घोषणा केली आहे. एअर इंडीयाने इस्राइलच्या तेल अवीवला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या आपल्या फ्लाईट संदर्भात मोठी घोषणा केली आहे. एअर लाईनने म्हटले आहे की एअर इंडीयाचे प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्या फ्लाईटला कोणत्याही चार्जेस शिवाय रिशेड्यूल करु शकतात. जर तुम्हाला तेल अवीवला एअर इंडीयाने जायचे आहे किंवा तेथून यायचे असेल तर तुम्ही रिशेड्यूल करु शकता. त्यासाठी आपल्याकडून कोणतेही अतिरिक्त चार्ज आकारला जाणार नाही.
इस्राइल आणि हमास दरम्यान युद्ध सुरु झाल्याने एअर इंडीयाने तेल अवीवला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. एअर इंडीयाची ही नवीन आणि स्पेशल ऑफर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी लागू आहे. परंतू ज्यांनी 9 ऑक्टोबरच्या पूर्वी विमानाची तिकीटे बुक केली आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे. कंपनीने कस्टमर केअर नंबरही जारी केले आहेत. ज्यावर तुम्ही 24 तास माहिती घेऊ शकता. हे नंबर पुढील प्रमाणे आहेत. – 0124 264 1407, 020-26231407 आणि 1860 233 1407
याआधी एअर इंडीयाने दिल्ली ते तेल अवीव दरम्यानच्या सर्व विमाने 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. टाटा ग्रुपने एअर इंडीया ताब्यात घेतल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या नवीन युनिफॉर्मला मॅचिंग करणारा नवा A 350 विमानांचा पहिला लूकचे अनावरण केले होते. एअर इंडीयाने याच वर्षाच्या सुरुवातीला नवीन रेड-ऑबर्जिन-गोल्ड लूक आणि नवा लोगो ‘द विस्टा’ सह स्वत:चे रिब्रांड केले होते.
इस्राइलवर पॅलेस्टाईनच्या हमास अतिरेकी संघटनेने आक्रमण केले आहे. त्यामुळे इस्राइलला प्रचंड मोठा हादरा बसला आहे. इस्राइलचे जगप्रसिद्ध गुप्तचर संघटना आणि युद्धसज्जता देखील हे आक्रमण ओळखू शकली नाही किंवा रोखू शकली नाही. इस्राइलचे 1100 हून अधिक नागरिक आतापर्यंत या यु्द्धात ठार झाले आहेत. आता इस्राइलच्या बाजूने अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आदी पाच देश उभे राहीले आहेत.