Israel-Palestine War | स्वस्त पेट्रोलचे स्वप्न विसरा! इस्त्राईल-हमास युद्धाने प्लॅन चौपट

Israel-Palestine War | इस्त्राईल-हमास युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात स्वस्ताई आणण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेवर या युद्धामुळे पाणी फेरले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याची कसरत केंद्र सरकार करत होते. पण या मेहनतीला दृष्ट लागण्याची भीती सतावत आहे.

Israel-Palestine War | स्वस्त पेट्रोलचे स्वप्न विसरा! इस्त्राईल-हमास युद्धाने प्लॅन चौपट
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 2:08 PM

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाची (Israel-Palestine War) धग आता सर्वच देशांना बसत आहे. भारत पण या युद्धाच्या परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. गेल्या दीड वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारने यश मिळवले. कंपन्या तोटा होऊन पण हा निर्णय बदलला नाही. आता पाच राज्यांच्या निवडणूक आणि लोकसभा निवडणूक 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवणे अथवा त्यात 5 रुपयांपर्यंत कपातीची शक्यता होती. पण या शक्यतेवर हमासच्या एका हल्ल्याने पाणी फेरले. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारी कंपन्या किती काळ तग धरतील हा प्रश्न आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम दिसू शकतो.

इराण खेळ बिघडवणार

इराण या युद्धात तेल ओतण्याचे काम करत आहे. इस्त्राईलवर दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्याचे या देशाने कौतुक केले आहे. तसेच जाहीर पाठिंबा दिला आहे. हे युद्ध जास्त दिवस सुरु राहिले तर त्याचा फटका लागलीच दिसून येईल. कच्चा तेलाचे भाव लवकरच शतक ठोकतील. ब्रेंट क्रूड ऑईल लवकरच 100 डॉलर पेक्षा जास्त झेप घेऊ शकते.

हे सुद्धा वाचा

गोल्डमॅनचा अहवाल काय

गोल्डमॅनने रविवारी याविषयीचा अहवाल सादर केला. त्यानुसार जून 2024 पर्यंत ब्रेंट क्रूड ऑईल शतक ठोकेल. कच्चे तेलाचे भाव 100 डॉलर पेक्षा अधिक होतील. सध्या त्याचा मोठा परिणाम दिसणार नाही. युद्ध लांबले तर मात्र कच्चा तेलाच्या किंमती वाढतील. सौदी अरब अथवा इराणने कच्चा तेलाचे उत्पादन कमी केले तर मात्र हे संकट गंभीर होईल.

किंमतीत चढउताराचे सत्र

एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउताराचे सत्र येऊ शकते. कच्चा तेलाचे किंमती 95 डॉलर प्रति बॅरलवर जातील. या किंमती 80 ते 85 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरु शकतील. इस्त्राईल आणि हमास यांच्यात लवकर युद्ध विराम न झाल्यास त्याचा फटका संपूर्ण जगाला भोगावा लागेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.