AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Sector : आयटी कंपन्यांना मंदीचा मोठा फटका; नफ्यात घसरण, कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे पाऊल

तंत्रज्ञानाच्या जगात (IT Sector) सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. महसुलातील घट आणि नुकसानीची जोखिम वाढल्याने अमेरिकेसहित भारतातील टेक कंपन्या खर्चावर नियंत्रण ठेवताना दिसून येत आहेत.

IT Sector : आयटी कंपन्यांना मंदीचा मोठा फटका; नफ्यात घसरण, कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे पाऊल
| Updated on: Aug 26, 2022 | 2:10 AM
Share

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या जगात (IT Sector) सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. महसुलातील घट आणि नुकसानीची जोखिम वाढल्याने अमेरिकेसहित भारतातील टेक कंपन्या खर्चावर नियंत्रण ठेवतायेत. टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक (investment) केलेल्या गुंतवणूकदारांची परिस्थिती तर आणखीनच दयनीय आहे.अमेरिकेतल्या फेसबुकपासून गुगलपर्यंत आणि भारतातील ‘टीसीएस’पासून (TCS) इन्फोसिसपर्यंतच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. जगभरातील टेक कंपन्यांचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. सतत दुसऱ्या त्रैमासिकात गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेटच्या नफ्यात घट झालीये. फेसबुक आणि इंस्टाची पेरेंट कंपनी मेटाचा नफा जूनच्या त्रैमासिकात 36 टक्क्यांनी घसरलाय. 2020 नंतर मायक्रोसॉफ्टच्या महसुलात देखील अत्यंत कमी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपन्याप्रमाणेच ट्विटरची परिस्थिती आहे.उत्पन्न कमी झाल्यानंतर टेक कंपन्यांनी खर्चात कपात करण्यास सुरुवात केलीये. भारतात, विप्रोनं या त्रैमासिकात वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा व्हेरिएबल पे स्थगित केलाय. काही कंपन्यांनी नवीन भरती थांबवलीये. विप्रो आणि टीसीएसनं व्हेरिएबल पे स्थगित केल्यानंतर इन्फोसिसनंही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा व्हेरियबल पे स्थगित केलाय तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या व्हेरियबल् पे 70 टक्क्यांनी कमी केलाय.

अमेरिकेची परिस्थिती आणखी गंभीर

भारतातील टेक कंपन्यांपेक्षा अमेरिकतील टेक कंपन्यांची परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. अमेरिकेत कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केलीये. जगातील सर्वात मोठी कंपनी, अॅपलनं नुकतंच 100 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. फेसबुकचे फाऊंडर मार्क झुकरबर्ग यांनी देखील कर्मचारी कपातीचे संकेत दिलेत. तंत्रज्ञान क्षेत्रात उगवणाऱ्या स्टार्टअप्सची परिस्थिती तर भयानकच आहे.पाच स्टार्टअप्स ज्यांनी युनिकॉर्न म्हणून स्थान मिळवलं होतं ते स्थान देखील त्यांनी गमावलय.Paytm mall, Snapdeal,Quikr आणि Hike चे व्हॅल्युएशन 100 कोटी डॉलरपेक्षा कमी झालंय. उर्वरित स्टार्टअप्सचीही परिस्थितीही चांगली नाही. zomato आणि paytm ची स्थिती तुम्हाला माहीतच आहे.

स्टार्टअप्समधील गुंतवणुकीला ब्रेक

स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचीही परिस्थिती सध्या अवघड आहे. जुनच्या पहिल्या त्रैमासिकात जपानच्या सॉफ्ट बँकेला 230 कोटी डॉलरपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागलाय. अलिबाबाच्या अँटग्रुपचा नफा 17 टक्क्यांनी कमी झालाय. तोट्याच्या धास्तीनं मुख्य गुंतवणूकदार टायगर ग्लोबलनं विविध स्टार्टअप्समधील गुंतवणुकीला ब्रेक लावलाय.सॉफ्टवेअर कंपन्यांची आर्थिक परिस्थिती डोलायमान झाल्यानं हार्डवेअर कंपन्यांनाही फटका बसलाय. जुनच्या त्रैमासिकात संगणकाची जगभरातील विक्री 9 वर्षानंतर 11 टक्क्यांनी कमी झालीये. याच काळात स्मार्टफोनच्या विक्रीतही 9 टक्क्यांचीं घसरण झाली आहे.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.