Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WFH : ऑफिस कशाला, घरुनच करा काम, IT कंपन्या अखेर का नरमल्या..

WFH : ऑफिसला येता कशाला, घरुनच काम करा, असा नारा आयटी कंपन्यांनी दिला आहे.

WFH : ऑफिस कशाला, घरुनच करा काम, IT कंपन्या अखेर का नरमल्या..
आयटी कंपन्या पेचातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 2:56 PM

नवी दिल्ली : देशातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहे. आयटी कंपन्यांनी (IT Companies) कर्मचाऱ्यांना ऑफिसला (Office) येण्याचा फतवा काढला खरा, पण अवघ्या काही दिवसातच आयटी कंपन्या नरमल्या. त्यांना हा फतवा मागे घ्यावा लागला आहे. ज्यांना यायचे त्यांनी यावे, अशी तडजोडीची भूमिका आयटी कंपन्यांनी स्वीकारली आहे.

कोरोना काळात आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि काम प्रभावित होऊ नये यासाठी घरुन काम (Work From Home) करण्याची सवलत जाहीर केली होती. रिमोट अॅसेस द्वारे कंपन्यांचे कामकाज सुरु राहिले.

आता कोरोनाचे मळभ हटले आहे. निर्बंध हटले आहेत. आयटी कंपन्या त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यासाठी दबाव टाकत आहेत. गेल्या महिनाभरापासून कंपन्यांचे प्रयत्न सुरु होते.

हे सुद्धा वाचा

कर्मचाऱ्यांना आता घराचा लळा लागला आहे. तसेच त्यांचे कामही चोख आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऑफिसला परतण्यास नाखूशी दाखवली आहे. दुसरीकडे कंपन्यांचे आग्रही सूर नरमले आहेत. त्यांनी दुराग्रही भूमिका सोडून दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कर्मचारी त्यांच्या गावातून, निमशहरातून वर्क फॉर्म होमचे काम करत आहेत. त्यांची मुले ही जवळच्याच शाळेत शिकत आहेत. एकंदरीतच कर्मचारी या नवीन बदलाला तयार नाहीत.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने कर्मचाऱ्यांना ऑफिसला परत येण्यासाठी एक महिन्याअगोदर ई-मेल केला होता. पण नंतर कंपनीचा दबाव मावळला. वर्क फॉर्म होमबाबत पुढे काहीच निर्णय झाला नाही.

टीसीएसचे एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, सध्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयात येत आहेत. सध्या आठवड्यात 25 टक्के कर्मचारी कार्यालयात येत आहेत. ही संख्या हळू हळू वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

विप्रो कंपनीत आठवड्यातील सात दिवसातील केवळ तीन दिवस कर्मचारी ऑफिसमध्ये कामावर येतात. वास्तविक कंपनीचे 30 कर्मचारी निमशहरी भागातील आहे. त्यांना पुन्हा कार्यालयात आणणे मोठे आव्हान असणार आहे.

इन्‍फोसिस या आयटी कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविले नाही. सध्या 45 हजार कर्मचारी ऑफिसला येत आहेत. इतर घरुन काम करत आहेत. कंपन्या कर्मचाऱ्यांना दुखवू इच्छित नाहीत. कारण आयटी क्षेत्रात अनुभवी कर्मचाऱ्यांनी राजीनामासत्र सुरु केलेले आहे.

एचआर सेवा क्षेत्रातील कंपनी CIEEL ने 19 टेक कंपन्यांचा सर्व्हे केला. अहवालानुसार, 46 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम सोडायला तयार नाहीत आणि त्यांना कार्यालयात यायचे नाही. त्यांचे कामही जोरदार असल्याने आयटी कंपन्यांसमोर पेच पडला आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.