Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela : सौंदर्याला लागले चारचांद! उर्वशी रौतेला हिने खरेदी केला इतक्या कोटींचा आलिशान बंगला

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलेच्या सौंदर्याची भूरळ अनेकांना आहे, पण तिच्या आलिशान बंगल्याची पण सध्या जोरात चर्चा रंगली आहे. त्यामागील कारण आहे, या आलिशान बंगल्याची किंमत, हा आकडा तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही..

Urvashi Rautela : सौंदर्याला लागले चारचांद! उर्वशी रौतेला हिने खरेदी केला इतक्या कोटींचा आलिशान बंगला
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 8:37 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi rautela) तिच्या सौंदर्य, अभिनय आणि सोशल मीडियातील वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या अदांनी अनेकांना घायळ केले. स्वर्गातील अप्सरा असेल तर ती डिक्टो अशीच असेल, अशी चर्चा रंगली. तिच्या आलिशान बंगल्याची (Urvashi Rautela Bunglow cum Luxurious Apartment ) पण सध्या जोरात चर्चा रंगली आहे. उर्वशी आता यश चोपडा कुटुंबियांची शेजारीण झाली आहे. त्यामागील कारण आहे, या आलिशान बंगल्याची किंमत, हा आकडा तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.

किंमत माहिती आहे का? Money control च्या अहवालानुसार, उर्वशी रौतेलाचे घर अतिशय आलिशान आहे. घरासमोर मोठे आणि देखणा बग्गिचा आहे. या घरात तिची स्वतःची जीम आहे. घराचे इंटेरिअर अत्यंत सुंदर आहे. या बंगल्यात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा आहे. या बंगल्याचे इंटेरिअर तिने स्वतःच ठरवले आहे. या बंगल्यात मॉर्डन आर्टचा वापर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती चांगल्या मालमत्तेच्या शोधात होती. चर्चेनुसार, उर्वशीने हा बंगला 190 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

हे सुद्धा वाचा

चार मजली बंगला उर्वशी रौतेलाचा हा भव्य बंगला चार मजली आहे. उर्वशी आता या बंगल्यात रहायला आली आहे. तिच्या चित्रपटाविषयी भलेही चर्चा होत नसतील. पण तिच्या या बंगल्याने ती चर्चेत आली हे मात्र नक्की. सध्या तिचा इंस्पेक्टर अविनाश ही ऑनलाईन वेबसीरीज चर्चेत आहे. रणदीप हुड्डा हा प्रमुख भुमिकेत असलेल्या या वेब सीरीजमध्ये उर्वशी दिसणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिच्या स्टाईलिश गाऊनची मोठी चर्चा रंगली होती. आता तिच्या बंगल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

वादाशी जुने नाते या अभिनेत्रीचे वादाशी जुने नाते आहे. तिचे क्रिकेटर ऋषभ पंत याच्यासोबत नाव जोडण्यात येते. एका मुलाखतीत तिने मिस्टर आरपी असा उल्लेख केला होता. त्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. ऋषभ पंतला मिस्टर आरपी असे ही म्हणतात.

इंस्पेक्टर अविनाश सध्या तिचा इंस्पेक्टर अविनाश ही ऑनलाईन वेबसीरीज चर्चेत आहे. रणदीप हुड्डा हा प्रमुख भुमिकेत असलेल्या या वेब सीरीजमध्ये उर्वशी दिसणार आहे. तर अभिनेत्री परवीन बॉबी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात पण ती दिसू शकते. ती अनेक प्रकल्पात दिसून येणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.