Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील IIFL Finance Ltd या बड्या फायनान्स ग्रुपच्या कार्यालयांवर IT ची धाड, कंपनीचे शेअर कोसळले

बडी फायनान्स कंपनी आयआयएफएल फायनान्स लिमिटेडच्या लोअर पऱळ येथील कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. कर चोरी केल्या प्रकरणात ही छापेमारी सुरु असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

मुंबईतील IIFL Finance Ltd  या बड्या फायनान्स ग्रुपच्या कार्यालयांवर IT ची धाड, कंपनीचे शेअर कोसळले
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 4:15 PM

मुंबईतील एका बड्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाने आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीनंतर मंगळवारी सकाळी ३६० वन वॅम लिमिटेड, आयआयएफएल फायनान्स लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्या आहे. कंपनीच्या लोअर परळ येथील कार्यालयातील सकाळपासून छापेमारी सुरु असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीतील फोन आणि आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त केल्याने कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान,३६० वन वॅम आणि आयआयएफएल फायनान्स या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती जवळपास ९% घसरल्या आहेत. तर आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेसच्या शेअरची किमत ६% घसरली आहे.

आयकर विभागाने मुंबईतील लोअर परळ येथील IIFL Finance Ltd या बड्या फायनान्स ग्रुपच्या कार्यालयांवर धाड टाकली आहे. आयआयएफएल या बड्या फायनांस ग्रुपच्या अनेक कार्यालयांवर छापेसत्र सुरु आहे. मुंबईतील अनेक कार्यालयात ही छापेमारी सुरु आहे. कर चुकविल्याच्या प्रकरणात ही छापेमारी सुरु असून या प्रकरणात अधिक माहिती मिळालेली नाही. आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर कंपनीचे फोन आणि डिजिटल उपकरणे जप्त केलेली आहेत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचे म्हटले जात आहे. या छापेमारीमुळे कंपनीच्य शेअरवर देखील परिणाम झाला आहे.कर चुकवल्यायप्रकरणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती असून आज सकाळपासून कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडसत्र सुरु आहे.

बेळगावातही आयकर विभागाचे छापे

कर्नाटकातील बेळगाव येथे दोन व्यावसायिकांच्या घरांवर आयकर विभागाच्या पथकाने आज सकाळी छापे टाकले आहेत. विनोद दोड्डनवार आणि पुष्पदंत दोड्डनवार या दोघा उद्योगपतींच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या पथकाने गोवा आणि बेंगळुरू या दोन्ही ठिकाणी ही कारवाई केली आहे. दोड्डनवर यांचे कुटुंब बेळगावातील एक प्रसिद्ध उद्योजक कुटुंब आहे. दोन्ही व्यावसायिकांचे घर बेळगावातील टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. आयकर विभागाच्या पथकाची छापेमारी अजूनही सुरू असून अधिक माहिती मिळालेली नाही.

हे सुद्धा वाचा