ITR Filling 2024 : …तर मग भरा दंड; आयटीआर फाईल करण्याची तारीख आली जवळ, ऑनलाईन-ऑफलाईन असा दाखल करा ITR
Income Taxpayers : आयटीआर भरण्याची तारीख जवळ आली आहे. 31 जुलै 2024 रोजीपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. आयटीआर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला असा भरता येईल.
तुम्ही नोकरी करत असाल अथवा व्यापार करत असाल तर तुम्हाला आयकर रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे. इनकम टॅक्स विभागाने आर्थिक वर्ष 2023-2024 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी इनकम टॅक्स रिटर्न-ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 अशी आहे. जर करदात्यांनी ही तारीख चुकवली तर त्यांना दंड भरावा लागेल. करदात्यांनी वेळेत वेळ काढून आयटीआर भरावा. त्यांनी रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. आयटीआर लवकर भरला तर त्यांना रिफंड, परतावा पण लवकर मिळेल.
आयटीआर दाखल करण्यासाठी या कागदपत्रांची गरज
आधार आणि पॅन कार्ड बँक खात्यांची सविस्तर माहिती फॉर्म 16 टीडीएस प्रमाणपत्र टॅक्स डिडक्शनसाठी गुंतवणूक पुरावा बँका आणि टपाल खात्यातील गुंतवणुकीचा पुरावा कर सवलतीसाठी देणगीचा पुरावा स्टॉक ट्रेडिंग स्टेटमेंट विमा पॉलिसीची पावती बँकेतील ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाची कागदपत्रे
ऑनलाईन कसा कराल आयटीआर फाईल
1. ऑनलाईन आयटीआर फाईल करण्यासाठी incometax.gov.in/iec/foportal या संकेतस्थळावर जा.
2. पॅन आणि युझर आयडी टाकून पासवर्ड तयार करा. लॉगिन करा.
3. असेसमेंट वर्ष आणि आर्थिक वर्ष निवडा.
4. आर्थिक वर्ष 2023-2024 तर मूल्यांकन वर्ष 2024-25 निवडा
5. आता आयटीआर फॉर्मचा टाईप निवडा
6. करपात्र उत्पन्न आणि टीडीएसनुसार आयटीआर फॉर्मची निवड करा
7. आता सर्व कागदपत्रे स्कॅन करुन स्टार्ट हा पर्याय निवडा
8. आता प्रश्नांसमोरील चेक बॉक्सवर मार्क करा
9. तुमचे उत्पन्न, कर कपात यासंबंधीचे विवरण संबंधीत रकान्यात भरा
10. आता रिटर्न जमा करण्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करा
11. रिटर्न ई-व्हेरिफाई करा. फॉर्म जमा झाल्याची माहिती स्क्रीनवर येईल
12. तुमच्या ई-मेलमध्ये आता याविषयीचा मॅसेज आला असेल
13. रिटर्न दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आता ई-व्हेरिफाई करणे गरजेचे असते.
ऑफलाईन मोडमध्ये आयटीआर कसा भरणार
1. आयटीआर फायलिंग पोर्टलवर लॉग-इन करा
2. आता उत्पन्नाची माहिती देऊन आयटीआर फॉर्म डाऊनलोड करा
3. एक्सेल शीटमध्ये आयटीआर फॉर्म डाऊनलोड करा
4. आता योग्य माहिती जमा करा.
5. माहिती भरलेला फॉर्म आता अपलोड करा
6. आता 6 पर्यायांपैकी एकाने आयटीआर व्हेरिफाईड करा
7. त्यानंतर रिटर्न फॉर्म जमा करा