जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल….

नवी दिल्ली : जगवार लँड रोवर इंडियाने Jaguar XJ ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने विशेष मॉडेल लाँच केले आहे. सोमवारी कंपनीने 50 व्या वर्षाच्या निमित्ताने स्पेशल एडिशन Jaguar XJ50 मॉडलचं भारतात लाँचिंग केलं. जगवार एक्सजे50 गाडीची एक्स शोरुम किंमत 1.11 कोटी रुपये आहे. तर स्टँडर्ड जगवार एक्सजेची एक्स शोरुम किंमत 1.02 कोटी रुपये आहे. […]

जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

नवी दिल्ली : जगवार लँड रोवर इंडियाने Jaguar XJ ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने विशेष मॉडेल लाँच केले आहे. सोमवारी कंपनीने 50 व्या वर्षाच्या निमित्ताने स्पेशल एडिशन Jaguar XJ50 मॉडलचं भारतात लाँचिंग केलं. जगवार एक्सजे50 गाडीची एक्स शोरुम किंमत 1.11 कोटी रुपये आहे. तर स्टँडर्ड जगवार एक्सजेची एक्स शोरुम किंमत 1.02 कोटी रुपये आहे.

विशेष एडिशन जगवार एक्सजे50चा लाँग वीलबेस मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 3.0 लीटर डिझेल इंजिन दिले आहे, जे 360PS पॉवर जनरेट करते. एक्सटीरियरची अपडेट्स पाहिले तर त्यामध्ये ऑटोबायोग्राफी स्टाईलचे फ्रंट आणि रिअर बंपर्स दिले आहेत. तसेच नवीन 19 इंचाची अलॉय व्हिल, क्रोम सराउंडसोबत क्रोम रेडिएटर ग्रिल आणि रिअर आणि साईट वेंट्स आहेत. जगवारच्या या नवीन मॉडेलमध्ये फुजी व्हाईट, सेंटोरिनी ब्लॅक, लोवर ब्लू आणि रोजेलो रेड हे चार रंग उपलब्ध आहेत.

गाडीचे आतील इंटरियर पाहिले तर, या लग्जरी गाडीमध्ये शानदार अशा सॉफ्ट-ग्रेन डायमंड कल्टेडच्या सीट्स आहेत. सेंटर आर्म रेस्टवर XJ50 चा लोगो आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही कार 6.2 सेकंड्समध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. गाडीचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रतितास आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.