Gudi padwa 2021: यंदाही सोने खरेदीचा मुहूर्त हुकला; जळगावच्या सुवर्णनगरीत कोरोनामुळे शुकशुकाट
दरवर्षी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2021) मुहूर्तावर जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळते. | Gold Silver
जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दुकाने बंद असल्याने ग्राहकांना सोने खरेदी (Gold) करता आलेली नाही. दरवर्षी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2021) मुहूर्तावर जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळते. परंतु या वर्षी निराशाजनक चित्र असल्याचे पाहायला मिळाले. (Gold buying on auspicious day of gudi padwa 2021)
गेल्यावर्षीदेखील कोरोनामुळे सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प होते. सलग दोन वर्षांपासून गुढीपाडव्याचा मुहूर्त टळत असल्याने सुवर्ण व्यापाऱ्यांसह ग्राहक नाराज झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक दी चेन अंतर्गत टाळेबंदी जाहीर केल्याने सुवर्णनगरी येथील व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवून राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
तर दुसरीकडे, दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती (Gold-Silver Rate today) वाढल्यात. मंगळवारी जून फ्युचर्स गोल्ड (Gold Price Today) 0.20 टक्क्यांच्या वाढीसह मल्टी कमोडिटी एक्सचेंज ((MCX) वर व्यापार करीत आहे. दुसरीकडे मे वायद्याच्या चांदीच्या किमतींमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या आठवड्यात अमेरिकन बाँडच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे सोन्यात चढउतार पाहायला मिळत आहेत.
सोन्याची नवी किंमत (Gold Price)
मंगळवारी एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याचा भाव 95 रुपयांनी वाढून 46,514 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किमती 0.41 टक्क्यांनी घसरल्या.
चांदीची नवी किंमत (Silver Price)
एमसीएक्सवरील मे फ्यूचर्स चांदीची किंमत 247 रुपयांनी वाढून 66,375 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात चांदी 1.3 टक्क्यांनी घसरली होती.
ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत सोन्याची किंमत 10 हजारांनी स्वस्त
यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोने 3,500 रुपयांनी कमी झालेय. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रतितोळा 56,200 रुपयांच्या उच्च किमतीपर्यंत गेले होते. त्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 10,000 रुपयांची घसरण झालीय.
गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीत चौपट वाढ
वाढती कोरोना जोखीम, स्थानिक लॉकडाऊन आणि रात्रीच्या कर्फ्यूमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळतोय. यामुळे ते पुन्हा सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वाटचाल करीत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात (Gold ETF) 6,900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सोन्याचे ईटीएफ गुंतवणुकीचे हे सलग दुसरे आर्थिक वर्ष आहे. त्याचबरोबर 2013-14 पासून गोल्ड ईटीएफमधून वारंवार पैसे काढले जात होते.
संबंधित बातम्या
कोरोनाच्या विळख्यात दागिने आणि रत्नांचा व्यवसाय; निर्यातीत 25% घट
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत; एप्रिलमध्ये बेरोजगारी वाढली, नोकऱ्यांवर गंडांतर?
(Gold buying on auspicious day of gudi padwa 2021)