Jalgaon Gold Rate | ‘सुवर्णनगरी’ जळगावात सोनेदराचा पुन्हा उच्चांक, एकाच दिवसात 800 रुपयांची वाढ, तोळ्याचा दर….
सुवर्णनगरी जळगावमध्ये एकाच दिवसात प्रतितोळा सोन्याच्या दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे (Jalgaon Gold Rate hike suddenly).
जळगाव : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच निवडक लोकांमध्ये लग्नाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, अशातच आता लग्नासाठी महत्त्वाचे असलेल्या सोन्याने सामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे. सध्या सोन्याच्या किमतीने नवा उच्चांक केला आहे. सुवर्णनगरी जळगावात एकाच दिवसात प्रतितोळा तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे (Jalgaon Gold Rate Jumps). त्यामुळे सोने खरदी करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना चांगलाच घाम फुटला आहे.
वायदा बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने ही वाढ झाल्याचं सोनं व्यापारी सांगत आहेत. एकाच दिवसात 800 रुपयांच्या वाढीनंतर जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 51 हजार 100 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 60 हजार 500 रुपये झाला आहे. सोन्याला मिळालेला हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव मानला जात आहे. पुढील काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात आणखी दरवाढ होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
दरम्यान, याआधीही जळगावमध्ये अशाचप्रकारे सोन्याचे भाव कडाडले होते. भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावानंतर जळगावात सोने-चांदीच्या भावावरही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 50 हजार रुपयांवर जाऊन पोहचले होते. (Jalgaon Gold Rate Jumps) त्यावेळी सोने-चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम झाल्याचं बोललं गेलं. त्यात कोरोनामुळे परदेशातून होणारी आवकही कमी असल्याने अधिक परिणाम झाल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं होतं.
सोन्याच्या दरात मागील महिनाभरापासून सोन्याचे दर सातत्याने वाढतच आहेत. महिनाभरात प्रतितोळा सोन्याच्या किमतीत 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 9 जून रोजी 46,800 रुपयांवर असलेले सोने 11 जून रोजी 47,200, तर 15 जून रोजी 47,800 रुपयावर पोहचले होते. आता आज (22 जुलै) सोन्याचे दर 51 हजार 100 वर पोहचले आहेत. 17 जून रोजी सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र, भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम होऊन 20 जून रोजी सोन्याच्या भावात थेट 700 रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी ते 48 हजार 700 रुपयांवर पोहचले होते.
सोन्याचे भाव चक्क 51 हजार रुपयांवर गेले आहेत. सोन्याच्या भावातील आतापर्यंतचा हा नवा उच्चांक असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद असताना कमॉडिटी बाजारात सोने 51 हजार रुपयांच्या पुढे पोहोचल्याने सर्वचजण आश्चर्यव व्यक्त करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारातील हा नवा उच्चांक मानला जात आहे.
संबंधित बातम्या :
Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी
Jalgaon Gold Rate | ‘सुवर्णनगरी’ जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 50 हजार रुपये प्रतितोळा
Jalgaon Gold Rate hike