share Market: बाबो, जूनमध्ये शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना 14 लाख कोटींनी डुबवले; पण जुलै पाडणार पैशांचा पाऊस! काय सांगतो सेंसेक्सचा इतिहास?

Sensex Return: जून महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. त्यांच्या पदरी निराशा आली. बीएसई निर्देशांकात 2300 अंकांची मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपये डुबले. परंतु, सेंसेक्सचा इतिहास पाहता जुलै त्यांच्यासाठी छप्पर फाडके परतावा देणार आहे, याविषयीचा रोचक इतिहास जाणून घेऊयात.

share Market: बाबो, जूनमध्ये शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना 14 लाख कोटींनी डुबवले; पण जुलै पाडणार पैशांचा पाऊस! काय सांगतो सेंसेक्सचा इतिहास?
जुलैमध्ये छप्पर फाड कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:58 AM

जून महिना गुंतवणूकदारांसाठी घाम फोडणारा ठरला. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्समध्ये कमालीची घसरण झाली. एकट्या जून महिन्यात गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपये डुबले (Investors has lost). परंतु, त्यांच्या या जखमांवर जुलै मलमपट्टी लावू शकतो. नुसतीच मलमपट्टी नाहीतर त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो. जर आतापर्यंतच्या जुलै महिन्याच्या इतिहासावर (July History) नजर टाकली तर बाजाराने जबरदस्त रिटर्न (Solid Return) दिल्याचे दिसून येते. कॉर्पोरेट डेटाबेस Ace Equity द्वारे एकत्रित केलेल्या 15 वर्षांच्या आकडेवारीवरुन तरी असे अनुमान काढणे संयुक्तीक ठरते. गेल्या 15 वर्षांच्या आलेखावरुन लक्षात येते की, सेसेंक्सने 6 वेळा 5 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे तर 9 वेळा एक टक्क्यांहून अधिकचा परतावा देण्यात सेंसेक्स यशस्वी ठरला आहे. मागील 15 वर्षांत जुलै महिन्यात निर्देशांकाने (Sensex)  5 टक्क्यांहून अधिकची घसरण पाहिलेली नाही. जुलै 2019 मध्ये निर्देशांकात सर्वाधिक म्हणजे 4.86 टक्क्यांची घसरण झाली होती. तर जुलै 2009 मध्ये मार्केट सर्वोच्च पातळीवर म्हणजे 8.12 टक्क्यांच्या रॉकेट स्पीडने पळाले होते.

जुलैमध्ये तिमाही निकाल येतील हाती

जुलै महिन्यात अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल घोषीत करतात. सध्याच्या महागाईच्या झळा या निकालावर परिणाम करतील. जुलै महिन्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक धोरणाचा पुनर्विचार करेल. अमेरिकेची केंद्रीय बँक सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेऐवजी महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच देशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाळ्यामुळे उत्पादन वाढेल आणि त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. गेल्यावर्षी जुलै महिन्यात निर्देशांकात 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. जुलै 2020 मध्ये 7.71 टक्के तर जुलै 2018 मध्ये 6.16 टक्क्यांची उसळी निर्देशांकाने घेतली होती.

हे सुद्धा वाचा

रोखीच्या बाजारातही घसरण

आयआयएफएल सिक्योरिटीजच्या ताज्या अभ्यास अहवालानुसार, बाजार सकारात्मक दिशेकडे प्रवासासाठी संघर्ष करत आहे. बाजारात म्हणावी तशी तेजी दिसून येत नाही. कॅश मार्केटचे मूल्य सातत्याने घसरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. एनएसई आणि बीएसई मध्ये जून महिन्यात एकूण रोखीतल्या उलाढालीत 23 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी 15,200 ते 16,200 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील बाजाराच्या प्रगतीचा अहवाल जोखला असता निफ्टी सातत्याने तीन हून अधिकची घसरण बघितलेली नाही. गेल्या 15 वर्षांच्या आलेखावरुन लक्षात येते की, सेसेंक्सने 6 वेळा 5 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे तर 9 वेळा एक टक्क्यांहून अधिकचा परतावा देण्यात सेंसेक्स यशस्वी ठरला आहे. मागील 15 वर्षांत जुलै महिन्यात निर्देशांकाने 5 टक्क्यांहून अधिकची घसरण पाहिलेली नाही. तर जुलै 2009 मध्ये मार्केट सर्वोच्च पातळीवर म्हणजे 8.12 टक्क्यांच्या रॉकेट स्पीडने पळाले होते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.